शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 10:10 AM2021-01-06T10:10:56+5:302021-01-06T10:12:39+5:30

Uday Samant Kolhapur-राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.

Complaints in the office of the Joint Director of Education will be investigated | शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार

मुंबईत राज्यातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कामकाजाची आढावा बैठक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी होणार मंत्रालयातील बैठकीत निर्णय : मंत्रालय आपल्या दारी मोहिम कोल्हापुरातून

कोल्हापूर : राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.

या बैठकीत पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रश्न व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढले जातील. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठात नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार प्रकाश आबिटकर यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी राज्यातील उच्चशिक्षण विभागाच्या कोल्हापूर येथील विभागीय सहसंचालक कार्यालयातील गैरकारभाराच्या कामकाजाचा आढावा घेतला होता.

त्यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी आबिटकर यांनी प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या कार्यालय प्रमुख यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली.

मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालबध्द कार्यक्रम तयार करा. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येईल. त्याची सुरवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करून, जे अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी आढळतील अशा दोषी अधिकारी व कर्मचारी यांना जागेवर निलंबित करण्यात येईल.

यावेळी विभागीय सह. संचालक डॉ. अशोक उबाळे, प्रिआयएएस सेंटर कोल्हापूरच्या संचालिका सोनाली रोडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी विशांत भोसले, प्रा. शशिकांत कांबळे उपस्थित होते.

 

Web Title: Complaints in the office of the Joint Director of Education will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.