कोल्हापुरातील सात रुग्णालयांच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी, चौकशी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:13 PM2023-09-14T13:13:08+5:302023-09-14T13:13:24+5:30

तक्रारी कशा स्वरुपाच्या आहेत याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही

Complaints to the health department of seven hospitals in Kolhapur, There will be an inquiry | कोल्हापुरातील सात रुग्णालयांच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी, चौकशी होणार 

कोल्हापुरातील सात रुग्णालयांच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी, चौकशी होणार 

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील सात रुग्णालयाची महापालिका आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत चौकशी होणार आहे. या समितीचे प्रमुख आहेत. पंचगंगा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी हे चौकशी पथकाचे प्रमुख आहेत.

कोल्हापूर शहरातील सात रुग्णालयासंबंधी आरोग्य विभागाकडे तक्रारी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा रुग्णालय उपसंचालक कार्यालयाकडून महापालिकेला चौकशी करण्यासंबंधी पत्र प्राप्त झाले होते. महापालिकेने त्या सात रुग्णालयांशी निगडीत तक्रारीसंबंधी चौकशीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.

रुग्णालयनिहाय चौकशी पथक नेमले आहे. महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीत तीन वैद्यकीय अधिकारी आहेत. पंचगंगा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी हे चौकशी पथकाचे प्रमुख आहेत. याशिवाय समितीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी व नोडल ऑफिसर (मुंबई नर्सिंग होम अॅक्ट) यांचा चौकशी समितीत सदस्य म्हणून समावेश आहे.

तक्रारी कशा स्वरुपाच्या आहेत याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. चौकशी झाल्यानंतर त्याचा अहवाल आरोग्य सेवा रुग्णालय उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यावर कोणती कारवाई करायची याचा निर्णय होणार आहे.

Web Title: Complaints to the health department of seven hospitals in Kolhapur, There will be an inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.