युवा समिती अध्यक्षांवर तक्रार; कन्नड संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:25 AM2021-03-17T04:25:07+5:302021-03-17T04:25:07+5:30

पोलीस प्रशासनाचा दुटप्पीपणाचा डाव सुरू असून, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर विविध आरोपांखाली तक्रार दाखल करण्यात ...

Complaints to youth committee chairs; Demand for Kannada organizations | युवा समिती अध्यक्षांवर तक्रार; कन्नड संघटनांची मागणी

युवा समिती अध्यक्षांवर तक्रार; कन्नड संघटनांची मागणी

googlenewsNext

पोलीस प्रशासनाचा दुटप्पीपणाचा डाव सुरू असून, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर विविध आरोपांखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. मराठी भाषिकांना भडकविण्यासाठी प्रक्षोभक भाषण करणे, बेळगावच्या शांततेला तडा लावणे आणि कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करणे असे आरोप करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

शुभम शेळके यांनी वेळोवेळी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात परखड मत व्यक्त केले आहे. याची सल कन्नड संघटना आणि काही कन्नड कार्यकर्त्यांना बोचत आहे. शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे गुंड असून बेळगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहेत. शिवाय मनपासमोरील लाल-पिवळा हटविण्यासाठी कन्नड संघटना, कन्नड कार्यकर्ते आणि प्रशासनाला धमकी दिली आहे, असे आरोपदेखील त्यांच्यावर करण्यात आले आहेत. कन्नड नेते अशोक चंदरगी, करवेचे अध्यक्ष दीपक गुडगनट्टी, राज्य नेते महादेव तळवार आदींच्या नेतृत्वाखाली शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. मनपासमोर फडकविण्यात आलेला अनधिकृत लाल-पिवळा, मराठी फलकांवर होणारी कारवाई, कन्नड संघटनांचा हैदोस, प्रशासकीय अत्याचार, पोलीस प्रशासनाची दडपशाही, मच्छे, पिरनवाडी, मणगुत्ती येथे झालेले शिवमूर्ती प्रकरण, नावगे येथे बसफलक प्रकरण, नुकताच शिवसेना वाहनावरील झालेला भ्याड हल्ला या साऱ्या घटनांवर परखडपणे आपले मत मांडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात प्रशासनाला जाब विचारला. याचा रोष ठेवत पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत शुभम शेळके यांच्यावर तक्रार दाखल करून घेतली आहे.

Web Title: Complaints to youth committee chairs; Demand for Kannada organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.