जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची १७४ कामे पूर्ण

By admin | Published: March 20, 2017 12:54 AM2017-03-20T00:54:21+5:302017-03-20T00:54:21+5:30

२१ पैकी सहा कोटी खर्च : वनतळे, मातीनाला, शेततळ्यांचे काम प्रगतिपथावर

Complete the 174 works of 'Jalukta' in the district | जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची १७४ कामे पूर्ण

जिल्ह्यातील ‘जलयुक्त’ची १७४ कामे पूर्ण

Next

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४७८ कामांपैकी १७४ कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी या कामांसाठी २१ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी आतापर्यंत सहा कोटी पाच लाख रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने हालचाली गतिमान केल्या आहेत.
‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे राज्यात काम सुरू असले तरी गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हे काम प्रभावीपणे राबविण्यात आले. सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत हे काम मोठ्या प्रमाणात झाले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ‘जलयुक्त’ची कामे प्रभावीपणे राबविण्यात आली.
‘पाणीदार’ जिल्हा असल्याने कोल्हापुरातील गावांना ‘जलयुक्त’चे निकष अडचणीचे ठरत आहेत. तरीही गेल्या वर्षी या कार्यक्रमात ६९ गावांचा समावेश झाला होता. या गावांसाठी ३० कोटींचा आराखडा तयार करण्यात येऊन त्याच्या माध्यमातून वनतळी, मजगी, मातीनाला बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळी, आदींची कामे पूर्ण करण्यात आली. त्याचा परिणामही यावर्षी दिसून येत आहे. दुष्काळानंतर जोरदार पाऊस झाल्याने ‘जलयुक्त’ची कामे शंभर टक्के यशस्वी झाली. पावसाचे पाणी या कामातून मुरविण्यात कृषी विभागाला यश आले. जिल्ह्याची पाणीपातळी दोन ते अडीच फुटांनी वाढण्यात ‘जलयुक्त’चे मोठे योगदान आहे.
या वर्षासाठी निकषांत गावे कमी बसली. २० गावांसाठी २१ कोटी मंजूर झाले आहेत. आतापर्यंत ४७८ पैकी १७४ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी सहा कोटी पाच लाख रुपये निधी खर्ची पडला आहे. आगामी दोन महिन्यांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे.


‘जलयुक्त’च्या कामांना गती आली असून, लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी


हे आहेत निकष
मागील दोन-तीन वर्षे पाणीटंचाई व टॅँकरने पाणीपुरवठा.
‘एकात्मिक पाणलोट’मध्ये धरलेली गावे
५० टक्के पाणलोटचे कामे पूर्ण
लोकसहभागातून काम करण्यास उत्सुक गावे.

Web Title: Complete the 174 works of 'Jalukta' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.