संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय थांबणार नाही

By admin | Published: April 27, 2017 12:08 AM2017-04-27T00:08:03+5:302017-04-27T00:08:03+5:30

संघर्ष यात्रा : कासेगावातील सभेत पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

Complete debt will not stop without deduction | संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय थांबणार नाही

संपूर्ण कर्जमुक्तीशिवाय थांबणार नाही

Next



इस्लामपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही, ही मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भूमिका निषेधार्ह आहे. फडणवीस सरकारच्या काळातील सात अधिवेशनांत आम्ही सर्व विरोधी पक्षांचे आमदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, त्यांचा सात-बारा कोरा करा आणि शेती उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्या, अशी मागणी करीत आहोत. मात्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. तरीही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून घेतल्याशिवाय ही संघर्ष यात्रा थांबणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काढलेल्या तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचे बुधवारी इस्लामपुरात आगमन झाले. त्यानंतर कासेगाव (ता. वाळवा) येथील राजारामबापू पाटील यांच्या ‘पदयात्री’ स्मारकासमोरील पटांगणात रात्री जाहीर सभा झाली. यावेळी चव्हाण बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादीचे आमदार अबू आझमी, आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार जितेंंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे, आमदार सुमनताई पाटील, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांचे आमदार रणरणत्या उन्हात राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख घेऊन राज्यभरात संघर्ष करीत आहेत. शेतकऱ्याला त्याच्या कर्जातून मुक्त करताना, सरकारला खडबडून जागे करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मोदी-फडणवीस यांनी निवडणुकीत मते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वाटेल ती आश्वासने दिली. त्यातील एकही आश्वासन पूर्ण न करता केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवीत आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त झाला आहे. उत्तर प्रदेशात भाजपने कर्जमाफी दिली; मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी फडणवीस सरकार चालढकल करीत आहे, ही निषेधार्ह बाब आहे.
ते म्हणाले की, शेतकरी असंघटित असल्याचा गैरफायदा ) भाजप सरकार उठवत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून भाजपचे नेते अकलेचे तारे तोडत आहेत. राज्यातील तूर उत्पादकांची सरकार थट्टा क रीत आहे. लाखो क्विंटल तूर रस्त्यावर पडून आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुटप्पी राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात लोकशाही आहे, ठोकशाही, हिटलरशाही नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या भूमीत हे चालणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास मानवी विकास निर्देशांक कमी होईल, असे सांगत भाजप नेत्यांसह रिझर्व्ह बॅँक, स्टेट बॅँकेचे अधिकारी व देशाचे आर्थिक सल्लागार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीएवेजी यापुढे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आयकर लावण्याचे षड्यंत्र नीती आयोगाकडून रचले जात आहे. देशाच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात जी वेळ आली नव्हती, तेवढी वाईट वेळ पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांवर आणली आहे. तामिळनाडूचे शेतकरी टोकाच्या आंदोलनाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पडेल ती किं मत मोजून हा संघर्ष करीतच राहणार आहे.
कर्जमाफी न दिल्यास लाखो शेतकऱ्यांना घेऊन सचिवालयाला घेराव घालण्याचा इशार सुनील तटकरे यांनी दिला. ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात केवळ अडीच वर्षात नऊ ते दहा हजार शेतकरी आत्महत्या करतात, ही दुर्दैवी बाब आहे. त्याला कें द्र व राज्य सरकारचे शेतकरीविरोधी धोरण कारणीभूत आहे. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरण होते. कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी देशात दुसरी कृषी क्र ांती केली. शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले. उद्योगपतींची कर्जे माफ करणाऱ्यांना भाजप सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही, ही लाजीरवाणी बाब आहे.
आमदार प्रकाश गजभिये, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे प्रवीण गायकवाड, आमदार दिलीप सोपल यांचीही भाषणे झाली. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्वागत केले. आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले. यावेळी आमदार भारत भालके, आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार जयदेव गायकवाड, आमदार ख्वाजा बेग, आमदार डी. एस. आहिरे, आमदार रामहरी रुपनवर, पृथ्वीराज पाटील, जनार्दनकाका पाटील, अरुण लाड, प्रा. शामराव पाटील, देवराज पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सदाभाऊंवरही टीका : या संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वक्त्यांनी भाजप सरकारवर आसूड ओढताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली. खोत यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेल्या यात्रेची थट्टा केली,यावरून त्यांचा शेतकरी चळवळीशी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काही संबंध उरला नसल्याचे स्पष्ट होत असल्याची टीका वक्त्यांनी केली.
वसंतदादा-राजारामबापूंची प्रेरणा
संघर्ष यात्रेचे बुधवारी जिल्ह्यात आगमन झाल्यावर सकाळी सांगलीत वसंतदादांच्या समाधीचे, तर सायंकाळी इस्लामपूर येथे राजारामबापूंच्या समाधीचे दर्शन घेतले. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांनी या परिसराचे आणि एकूणच महाराष्ट्राचे सामाजिक जीवनमान उंचाविण्यासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ही संघर्ष यात्रा राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहील, अशी ग्वाही सर्व वक्त्यांनी दिली.

Web Title: Complete debt will not stop without deduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.