महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आंबी यांची चौकशी पूर्ण

By admin | Published: March 14, 2017 02:22 PM2017-03-14T14:22:04+5:302017-03-14T14:22:04+5:30

अहवाल पोलिस महासंचालकांना सादर : प्रभारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची माहिती

Complete the inquiry of Ambe, who has been sexually assaulted by a woman employee | महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आंबी यांची चौकशी पूर्ण

महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आंबी यांची चौकशी पूर्ण

Next

महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आंबी यांची चौकशी पूर्ण
अहवाल पोलिस महासंचालकांना सादर : प्रभारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची माहिती
कोल्हापूर : भवानी मंडपातील कार्यालयात गृहरक्षक दलातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे करत असल्याच्या संशयावरून केंद्रनायक पद्माकर आंबी यांची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अधिकारी गृहरक्षक दलाच्या राज्य प्रशासकीय अधिकारी राजश्री कोळी यांनी पोलिस महासंचालकांना सादर केला आहे. अशी माहिती प्रभारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दिली.
भवानी मंडप येथे गृहरक्षक दल (होमगार्ड)च्या कार्यालयात दि. १९ सप्टेंबर २०१६ च्या रात्री आंबी व महिला होमगार्ड मिळून आले होते. आंबी हे महिलेशी अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. ते रात्री दहाच्या पुढे बंद खोलीत महिलेसोबत मिळाल्याने डॉ. बारी यांनी त्याच्या विरोधातील चौकशी अहवाल गृहरक्षक दलाचे पोलिस महासंचालकांना पाठविला होता. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी कोळी या दोन दिवस कोल्हापुरात ठाण मांडून होत्या. त्यांनी आंबीसह पीडित महिला, वॉचमन, काही कर्मचारी व पोलिसांचे जबाब घेतले. हा चौकशी अहवाल त्यांनी पोलिस महासंचालक (होमगार्ड) यांच्याकडे सादर केला आहे, असे डॉ. बारी यांनी सांगितले.
माझ्या विरोधात कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी खोटे आरोप करुन बदनामी करीत आहेत. माझ्या हातून असे कोणतेही गैरकृत्य झालेले नाही.
पद्माकर आंबे (केंद्रनायक हेमगार्ड कार्यालय)

Web Title: Complete the inquiry of Ambe, who has been sexually assaulted by a woman employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.