शिरोळ बंधाऱ्याच्या डागडुजीचे काम लवकर पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:04+5:302021-05-25T04:28:04+5:30
शिरोळ : येथील पंचगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. यावेळी बंधाऱ्याच्या ...
शिरोळ : येथील पंचगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीच्या कामाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. यावेळी बंधाऱ्याच्या डागडुजीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश त्यांनी पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शिरोळ बंधाऱ्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यामुळे शिरोळसह परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. दरम्यान, या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली असून, या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. या कामाची पाहणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी केली. याप्रसंगी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, बाजार समिती सभापती विजयसिंह माने, एस. बी. महाजन, बाबा पाटील, पद्मसिंह पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
------------------------
पुलाऐवजी रस्त्याचे मजबुतीकरण
शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरील ओढ्यावर पूल उभारण्यासाठी मान्यता मिळाल्यानंतर कामदेखील सुरू झाले होते. मात्र, पूर परिस्थितीच्या काळात व अतिवृष्टी झाल्यानंतर याठिकाणी होणाऱ्या पुलाच्या भरावामुळे शेतीच्या नुकसानीवरून शेतकऱ्यांनी या पुलाचे काम बंद पाडून न्यायालयातून या कामास स्थगिती मिळविली होती. दरम्यान, राज्यमंत्री यड्रावकर यांनी त्याठिकाणची पाहणी करून भराव न टाकता पाईप टाकून क्राँक्रिटीकरण करून रस्ता मजबूत करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या. या निर्णयामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०८
फोटो ओळ - शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरील बंधाऱ्याच्या कामाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.