थेट पाईपलाईन योजनेचे काम गतीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:18+5:302021-05-27T04:27:18+5:30

आमदार जाधव यांनी काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. जॅकवेल केंद्राच्या कामाची पाहणी ...

Complete the work of direct pipeline plan expeditiously | थेट पाईपलाईन योजनेचे काम गतीने पूर्ण करा

थेट पाईपलाईन योजनेचे काम गतीने पूर्ण करा

Next

आमदार जाधव यांनी काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. जॅकवेल केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्प अधिकारी हर्षजित घाटगे, ठेकेदार जी.के.सी. प्रोजेक्टस लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी, वसंतराव नलवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते. योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव व वन विभाग व महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेवून प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून, योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या. विशेषतः धरणक्षेत्रातील इन्स्पेक्शन वेल, इंटेक वेल, कनेक्टिंग पाईप, जॅकवेल आदी इत्यादी कामे पूर्ण करण्याच्या कालावधीबाबत नियोजित वेळेचा बार चार्ट तयार करून, काम गतीने पूर्ण करण्याची सूचना दिली.

फोटो (२६०५२०२१-कोल-थेट पाईपलाईन फोटो) : कोल्हापुरात बुधवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.

Web Title: Complete the work of direct pipeline plan expeditiously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.