शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करा, महापौरांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 05:03 PM2019-06-10T17:03:10+5:302019-06-10T17:04:44+5:30
शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावे, असे आदेश महापौर सरिता मोरे यांनी राजर्षी शाहू समाधिस्थळ विकास समितीच्या बैठकीत दिले. छ. ताराराणी सभागृहात बैठकीत शाहू समाधिस्थळाच्या कामाचा महापौर मोरे यांनी आढावा घेतला.
कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावे, असे आदेश महापौर सरिता मोरे यांनी राजर्षी शाहू समाधिस्थळ विकास समितीच्या बैठकीत दिले. छ. ताराराणी सभागृहात बैठकीत शाहू समाधिस्थळाच्या कामाचा महापौर मोरे यांनी आढावा घेतला.
बैठकीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पदाधिकारी आणि समाधी स्थळ विकास समिती सदस्य उपस्थित होते. स्टोन व पेव्हिंग, लँडस्केपिंग कामासाठी बार चार्ट तयार करून दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले.
महापौर मोरे आणि आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी समाधिस्थळ कामाचा आढावा ठेकेदार व्ही. के. पाटील यांच्याकडून घेतला.
महापौर मोरे यांनी ३१ जुलैपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे आदेश संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिले. त्यानंतर भव्यदिव्य लोकार्पण सोहळा करावा, असेही महापौर मोरे यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, सभागृहनेता दिलीप पोवार, प्रभाग समिती सभापती हसिना फरास, नगरसेविका मेहेजबीन सुभेदार, पुराभिलेख विभागाचे गणेश खोडके, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, आदी उपस्थित होते.