‘ॲस्टर आधार’मध्ये गुंतागुंतीच्या ह्दयशस्त्रक्रिया सहजशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:59+5:302021-02-05T07:11:59+5:30
कोल्हापूर : तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अत्याधुनिक अशी यंत्रसामग्री आणि शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील देखभाल यामुळे येथील ॲस्टर आधार रुग्णालयामध्ये ...
कोल्हापूर : तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अत्याधुनिक अशी यंत्रसामग्री आणि शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागातील देखभाल यामुळे येथील ॲस्टर आधार रुग्णालयामध्ये गुंतागुंतीच्या ह्दयशस्त्रक्रिया सहजशक्य झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मोटे यांनी ही माहिती दिली.
एका ८० वर्षांच्या वृद्धाची १५ वर्षांपूर्वी ह्दयाची डाव्या बाजुची झडप शस्त्रक्रिया करून बदलली होती. मात्र, त्यांचे ह्दय बंद पडेल अशी शक्यता वाटल्याने त्यांना ॲस्टर आधारमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांची कृत्रिम झडप खराब झाल्याचे स्पष्ट झाले; परंतु त्यांच्या वयाचा विचार करता ओपन हार्ट सर्जरी करणे धोक्याचे होते. परंतु ॲस्टर आधारच्या ह्दयशस्त्रक्रिया विभागाच्या समूहाने कॅथेटरद्वारे ह्दयाची कृत्रिम झडप आधीच्या झडपेवर यशस्वीरीत्या बसवली. पश्चिम महाराष्ट्रात पार पडलेली ही पहिलीच व्हॉल्व्ह इन व्हॉल्व्ह तावी आहे. अशाच एका ८० वर्षांच्या मधुमेह असणाऱ्या रुग्णाची शॉक व्हेव्ह इंट्राव्हॅस्कुलर बलून लिथोट्रिप्सी करण्यात आली.
डॉ. कौस्तुभ माचनूरकर, डॉ. निशाद चिटणीस, डॉ. विजयसिंह पाटील यांनी अथक परिश्रमातून अशा अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. चोवीस तास उपलब्ध डॉक्टर्स यांच्यामुळे ॲस्टर आधारमध्ये अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढल्याचे आनंद मोटे यांनी सांगितले.