भुदरगड तालुक्यात सर्वच पक्षांना संमिश्र यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:27 AM2021-01-19T04:27:07+5:302021-01-19T04:27:07+5:30
कलनाकवाडी, फणसवाडी, आदमापूर नवरसवाडी, नाधवडे, नागणवाडी, ममदापूर, मडगाव, पांगिरे, लोटेवाडी, सोनुर्ली, आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. आंबवणे, गंगापूर, बसरेवाडी, ...
कलनाकवाडी, फणसवाडी, आदमापूर नवरसवाडी, नाधवडे, नागणवाडी, ममदापूर, मडगाव, पांगिरे, लोटेवाडी, सोनुर्ली, आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. आंबवणे, गंगापूर, बसरेवाडी, मोरेवाडी, डेळे चिवाळे, तांब्याचीवाडी, नवले, भेंडवडे, म्हसवे, बेडीव म्हासरंग, शिवडाव, बारवे, मेघोली या गावांत सत्ता कायम राहिली आहे.
खानापूर, आंबवणे, कलनाकवाडी, गंगापूर, नाधवडे, आदमापूर येथे अटातटीची लढत झाली. एरंडपे खेडगे येथील एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सूरज सर्जेराव पाटील यांनी विजय संपादन केला. शिवसेनेने २१, राष्ट्रवादीने २६, तर काँग्रेसने १६ गावांत सत्ता आल्याचा दावा केला आहे.
चौकट
पाचजणांना
ताब्यांचीवाडी, नागणवाडी, सुक्याचीवाडी व सालपेवाडी येथे उमेदवारांना समान मते पडली. शेवटी चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्यात आला.