गडहिंग्लजच्या विशेष लोकअदालतीमध्ये भूसंपादनाच्या ३२ प्रकरणांत तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:22 AM2021-02-08T04:22:33+5:302021-02-08T04:22:33+5:30

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि गडहिंग्लज तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये ...

Compromise in 32 land acquisition cases in Gadhinglaj Special Lok Adalat | गडहिंग्लजच्या विशेष लोकअदालतीमध्ये भूसंपादनाच्या ३२ प्रकरणांत तडजोड

गडहिंग्लजच्या विशेष लोकअदालतीमध्ये भूसंपादनाच्या ३२ प्रकरणांत तडजोड

Next

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि गडहिंग्लज तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये सर्फनाला मध्यम प्रकल्पाच्या भू-संपादनातील न्यायप्रविष्ट ३५ प्रकरणांपैकी ३२ प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली. त्यामुळे पक्षकार धरणग्रस्त ३ कोटी ४२ लाख ४१ हजार ६०८ रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अदालतीचे कामकाज तब्बल साडेआठ तास सुरू होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पंकज देशपांडे व भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोणत्याही औपचारिक कार्यक्रमाशिवाय लोकअदालतीच्या कामकाजाला थेट सुरुवात झाली. संबंधित पक्षकार व त्यांचे नातेवाईक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा पॅनलप्रमुख म्हणून ए. आर. उबाळे यांनी समुपदेशक व मध्यस्थाची भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली.

सरकारतर्फे सरकारी वकील एस. ए. तेली, पॅनल अ‍ॅडव्होकेट विकास पाटील व पी. एल. गावडे यांनी, कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे आर. एस. कबूर व सहायक अभियंता एस. वाय. पाटील यांनी, तर पक्षांतर्फे ए. व्ही. कंकणवाडी, एम. एम. बिदे, ए. बी. शिंत्रे यांनी काम पाहिले.

याकामी अधीक्षक सोपान मेथे, सहायक अधीक्षक एम. एल. शिंदे, लघुलेखक दीपक चौगुले, वरिष्ठ लिपिक सुनीता मोरे, कनिष्ठ लिपिक भास्कर पाटील, चेतन गवळी, शरद बुगडे, निखिल नाईक व एस. एस. उंडाळे यांच्यासह केतन चोपडे, विराप्पा कांबळे, राजेश पवार, गुंगा कांबळे आदी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-------------------------------------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील जिल्हा न्यायालयात आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा पॅनलप्रमुख म्हणून ए. आर. उबाळे यांनी पक्षकारांचे समुपदेशन केले. यावेळी अ‍ॅड. एस. ए. तेली, विकास पाटील व पी. एल. गावडे आदी उपस्थित होते.

क्रमांक :०७०२२०२१-गड-०९

-------------------------------------------------------

* न्यायाधीशांनी मानले पक्षकारांचे आभार..!

तदर्थ न्यायाधीश उबाळे यांनी पहिल्या मजल्यावरून स्वत: खाली येऊन न्यायालयाच्या आवारात उपस्थित राहिलेल्या वयोवृद्ध व आजारी पक्षकारांची भेट घेतली. त्यांना तडजोडीची माहिती देऊन निवाड्याची औपचारिकता पूर्ण केली. तसेच तडजोडीस सहमती दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ पक्षकारांचे त्यांनी आभारही मानले.

Web Title: Compromise in 32 land acquisition cases in Gadhinglaj Special Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.