इमारत फीची सक्ती, कोल्हापुरातील होलीक्रॉस शाळेत तोडफोड, कार्यालयामध्ये घुसुन नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:00 PM2019-01-22T16:00:50+5:302019-01-22T16:13:41+5:30
पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील होलीक्रॉस हायस्कुलची तोडफोड केली आहे. कार्यालयामध्ये घुसुन १० ते १५ कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचांवर दगड फेकून नासधूस केली आहे. कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि कार्यालयीन साहित्य सुद्धा कार्यकर्त्यांनी विस्कटून टाकले आहे. याला विरोध करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला देखील कार्यालयाच्या बाहेर काढत कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.
कोल्हापूर : पहिलीच्या विद्यार्थ्यांना इमारत फी सक्तीची केल्याच्या निषेधार्थ एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील होलीक्रॉस हायस्कुलची तोडफोड केली आहे. कार्यालयामध्ये घुसुन १० ते १५ कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचांवर दगड फेकून नासधूस केली आहे. कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि कार्यालयीन साहित्य सुद्धा कार्यकर्त्यांनी विस्कटून टाकले आहे. याला विरोध करणाऱ्या एका महिला शिक्षिकेला देखील कार्यालयाच्या बाहेर काढत कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.
एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिला शिक्षकांना शिवीगाळ सुद्धा केल्याचा आरोप येथील प्रसाशनाने केला आहे. दरम्यान इमारत फी विद्यार्थ्यांना सक्तीची करू नये असे निवेदन शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच शाळा प्रशासनाला दिले होते. मात्र यावर शाळा प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नव्हता उलट विध्यार्थ्यांकडूनच इमारत फी घ्यावी अशी भूमिका शाळेने ठेवल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. याला विरोध म्हणून कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफाड केली. पोलिसानी घटना स्थळी धाव घेत माहिती घेतली आहे.
दरम्यान यावर आपली भूमिका स्पष्ट करताना शाळेने फी संदर्भातील निर्णयाला कोणत्याही पालकांची लेखी तक्रार नव्हती तरीही कार्यकर्त्यांनी प्रचंड निर्माण दहशत करत कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे.