मतदार जागृतीसाठी बनविली संगणक प्रणाली

By admin | Published: February 5, 2016 11:28 PM2016-02-05T23:28:55+5:302016-02-06T00:01:39+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : निवडणुकीच्या अधिसूचनेपासून शपथविधीपर्यंतच्या बाबींचा समावेश

Computer system created for voter awareness | मतदार जागृतीसाठी बनविली संगणक प्रणाली

मतदार जागृतीसाठी बनविली संगणक प्रणाली

Next

राम मगदूम-- गडहिंग्लज -देशातील संसदीय लोकशाही शासनपद्धतीची ओळख शालेय वयातच व्हावी आणि विद्यार्थ्यांना आदर्श नागरिकत्वाचे, आदर्श मतदारांचे अन् आदर्श नेतृत्वाचे धडे शालेय वयातच मिळावेत यासाठी एका तरुणाने शालेय निवडणुकीसह विविध निवडणुकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘कॉम्प्युटराईज्ड व्होटिंग सिस्टीम’ची निर्मिती केली आहे. या कल्पक तरुणाचे नाव आहे, आण्णासाहेब ऊर्फ विजय रावसाहेब देसाई.
बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विजयचा जन्म झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण तेरणीच्या ए. आर. देसाई हायस्कूलमध्ये झाले. महागावच्या संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निमध्ये त्याने ‘इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी’ हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने कोल्हापूरच्या ‘केआयटी’कॉलेजमधून त्याने याच विषयाची अभियांत्रिकी पदवी घेतली.
अर्ध्या दिवसात पार पडणाऱ्या शालेय निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची चिंताजनक घटती आकडेवारी पाहून तो अस्वस्थ होत असे. त्यावर उपाय म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने ही प्रणाली तयार केली आहे. निवडणुकीच्या अधिसूचनेपासून शपथविधीपर्यंतच्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे.
भारतीय लोकशाहीची ओळख, निवडणूक अधिसूचना, मतदार यादी, मतदार ओळखपत्र, उमेदवारी अर्ज, संकल्प पत्र, खर्चाची पावती, नमुना ७ अ, प्रचारपत्रिका, वचननामा, मान्यवरांचे मतदानासाठी आवाहन, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतमोजणी, फेर मतमोजणी, निकाल, सविस्तर निकालपत्र, निवड पत्र, शपथविधी, आदी सर्व बाबी यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
याकामी बुगडीकट्टीचे प्राथमिक शिक्षक मारुती राजगोळे, गौतम गुळवे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांचे त्याला सहकार्य लाभले. गेल्या दोन वर्षांपासून या शाळेच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक त्याच्या ‘सिस्टीम’द्वारेच होत आहे.

Web Title: Computer system created for voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.