जांभळी विद्यामंदिराची संकल्पना प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:35+5:302021-06-21T04:17:35+5:30

घनशाम कुंभार : यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने चित्तरकथा शाळेच्या भिंतीवर साकारून शिक्षकांनी लॉकडाऊनचा सदुपयोग केला ...

The concept of Purple Vidyamandira is inspiring | जांभळी विद्यामंदिराची संकल्पना प्रेरणादायी

जांभळी विद्यामंदिराची संकल्पना प्रेरणादायी

Next

घनशाम कुंभार :

यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने चित्तरकथा शाळेच्या भिंतीवर साकारून शिक्षकांनी लॉकडाऊनचा सदुपयोग केला आहे. ही नवी संकल्पना इतरांना चालना देणारी आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी आहे.

जांभळी (ता. शिरोळ) येथील विद्यामंदिर क्रमांक दोनच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्याने ते वर्ग हनुमान मंदिर व संस्कृती सभागृहामध्ये भरत होते. सर्व शिक्षा अभियानातून एका खोली व तीन खोल्या जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या जिल्हा नियोजन फंडातून निर्माण झाल्यात. माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे कार्यालय बांधकामाचा भार पेलला. ही इमारत रंगरंगोटी व यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने घेतल्याने त्यांनी केलेला प्रयत्न व त्यांना मिळालेल्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेच्या भिंतींना रंग लागला. त्या जिल्ह्यातील जागतिक पातळीवर महत्त्व सिद्ध केलेल्या चित्रकथा भिंतीवर साकारल्या. भिंतीवर राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या कर्तृत्ववान व्यक्ती, राधानगरी धरण, रंकाळा तलाव, पंचगंगा नदीघाट हे नैसर्गिक वैशिष्ट्ये, दूधकट्टा, चित्रनगरी, कोल्हापुरी चप्पल, गु-हाळ घरे, शिवाजी विद्यापीठ, खासबाग मैदान, न्यू पॅलेस, भवानी मंडप, पन्हाळगड, वेडात मराठे वीर दौडले सात, हा ऐतिहासिक ठेवा जोतिबा मंदिर, अंबाबाई मंदिर ही पवित्र धार्मिक स्थळे यासह शैक्षणिक अभ्यासक्रमांची चित्रे रेखाटली आहेत.

यासाठी मुख्याध्यापक अमर दुधाळे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह, गटशिक्षण अधिकारी दीपक कामत, विस्तार अधिकारी आर. डी. काळगे, अण्णा मुंडे, दत्तात्रय जाधवर, विश्वास मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

---

कोट - दृश्य माध्यमातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांना लवकर आत्मसात होते. या अनुभवातून पहिली ते चौथी विद्यार्थ्यांची गुणवत्ता बौद्धिक, मानसिक व शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावी यासाठी या चित्रांकित भिंती तयार केल्या आहेत.

- अमर दुधाळे, मुख्याध्यापक

फोटो - २००६२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - जांभळी (ता. शिरोळ) येथे विद्यामंदिर क्रमांक दोनमध्ये भिंतीवर जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित करणारी चित्रे रेखाटली आहेत. (छाया-घनशाम कुंभार, यड्राव)

Web Title: The concept of Purple Vidyamandira is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.