साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:04 AM2017-11-18T01:04:15+5:302017-11-18T01:07:25+5:30

Concerns about liver damage due to the fall in sugar prices | साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

Next


कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.
गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले नाहीत तोपर्यंत प्रतिक्विंटल ३४५० रुपयांपर्यंत साखरेचे दर खाली आले आहेत. हंगाम संपल्यानंतर काय होईल, ही बाब कारखान्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साखरेचे दर वाढू लागले की केंद्रीय वाणिज्य मंत्री रामविलास पासवान ट्विट करायचे, ‘कारखाने व व्यापाºयांना स्टॉक मर्यादा घातली.’ पण आता ते गप्प का? असा सवाल करीत गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ झाल्याने सरासरी तीन हजार रुपये एफआरपी झाली आहे.
उसाच्या पहिल्या उचलीबाबत निर्णय घेताना ३५०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. साखरेचे दर ३४०० रुपयांच्या खाली येऊ नयेत, यासाठी शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व रघुनाथदादा पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
सध्या राज्य बॅँकेने साखरेचे ३५०० रुपये मूल्यांकन केले असून त्यातील प्रक्रिया खर्च प्रतिटन २५० रुपये, अल्पमुदत कर्ज, नजरगहाण कर्ज, सहवीज / एम. टी. / मशिनरी आधुनिकीकरण कर्ज, पॅकेज पुनर्बांधणी कर्जहप्ता, थकीत व्याज यांसाठी प्रतिटन ५०० रुपये राखून ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे केवळ उसासाठी २२७५ रुपये उपलब्ध होणार आहेत. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर मागील पंधरवड्यातील उसाचे पैसे भागवायचे म्हटले तरी अडचण येणार आहे.
साखर मूल्यांकन व शॉर्ट मार्जिन
साखर मूल्यांकन बॅँकांकडून उसाची पहिली कमी पडणारी
मिळणारी रक्कम उचल रक्कम
३५०० रुपये २२२५ रुपये ३००० रु. ७७५ रुपये
३४५० रुपये २१८२ रुपये ३००० ८१८ रुपये
३४०० रुपये २१४० रुपये ३००० ८६० रुपये
३३०० रुपये २०५५ रुपये ३००० ९४५ रुपये
यासाठीच तीन टप्प्यांत दर हवा
पक्क्या मालाचा दर निश्चित नसताना, तो वर्षभर गोदामामध्ये पडून राहत असताना कच्च्या मालाचा दर ठरविणारा साखर उद्योग हा एकमेव आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी उसाचा दर तीन टप्प्यांत देणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
शेट्टींवर विश्वास !
देशातील शेतकरी संघटनांचा दोन दिवसांत दिल्लीत मोर्चा आहे. तिथे राजू शेट्टी साखरेच्या घसरलेल्या दराचा मुद्दा मांडतील, याचा मला विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Concerns about liver damage due to the fall in sugar prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती