हातकणंगलेतील नागरिकांचे लेखी ठराव घेऊन उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:38+5:302021-08-18T04:29:38+5:30
हातकणंगले गावतळ्यातील दूषित पाण्याचा निचरा होता नाही. गावाशेजारील लोकवस्तीत तलावाचे दूषित पाणी साचून राहात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण ...
हातकणंगले गावतळ्यातील दूषित पाण्याचा निचरा होता नाही. गावाशेजारील लोकवस्तीत तलावाचे दूषित पाणी साचून राहात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. या तलाव्यातील दूषित पाणी शेजारील शेतात घुसून शेती नापीक होत चालल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या दूषित पाण्याचा निचरा जुन्या शाहूकालीन मोरीच्या माध्यमातून शहराच्या पश्चिमेकडील ओढ्यात सोडण्यात यावे. गाव तलावाचा गाळ काढून, त्याची मोजणी करून सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी स्वातंत्र दिनादिवशीच हातकणंगले नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
मंगळवारी मुख्याधिकारी योगेश कदम, नगराध्यक्ष अरुणकुमार जानेवकर, सर्व नगरसेवकांची बैठक होऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे संबंधित गाव तलावाची तत्काळ मोजणी करणे, त्यातील गाळ काढणे व भुयारी गटारी मार्गातून दूषित पाणी ओढ्याला सोडणे यासह इतर मागण्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याबाबतचा ठराव व लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते रमेश स्वामी, सुभाष चव्हाण, श्रीकांत इंगवले, संतोष टोपकर आदींनी उपोषण मागे घेतले.
फोटो ओळ =
हातकणंगले नगरपंचायतीच्या समोर आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पत्र दिले.