मंडलिक कारखान्याच्या हंगामाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:32+5:302021-03-23T04:24:32+5:30

या हंगामामध्ये १२८ दिवसात ५ लाख ४० हजार ८०१ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६ लाख ७७ हजार क्विंटल ...

Concluding Season of Mandlik Factory | मंडलिक कारखान्याच्या हंगामाची सांगता

मंडलिक कारखान्याच्या हंगामाची सांगता

Next

या हंगामामध्ये १२८ दिवसात ५ लाख ४० हजार ८०१ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६ लाख ७७ हजार क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. यंदा १२.५१ टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. यंदा कार्यक्षेत्रातून ४ लाख १ हजार ३३० टन, तर गेटकेनमधून ५६ हजार ९२५ व कर्नाटकमधून ८२ हजार ५४५ टन इतका ऊस गळितासाठी उपलब्ध झाला.

को-जनरेशन प्रकल्पातून एकूण ३ कोटी ७४ लाख ६२ हजार ९४९ युनिट वीज निर्मिती झाली. त्यापैकी २ कोटी २० लाख ०५ हजार ६५३ इतकी युनिट्‌स वीज ही महावितरण कंपनीस निर्यात केली. एक कोटी ५२ लाख ५८ हजार २९६ युनिट्‌स कारखान्यासाठी वापरण्यात आली.

लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे आणि अध्यक्ष संजय मंडलिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, कंत्राटदार, ऊसतोड मजूर यांच्या सहकार्यामुळे हा हंगाम यशस्वी झाला. याबाबत बंडोपंत चौगुले यांनी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी संचालक आप्पासोा तांबेकर, शहाजी यादव, मारुती काळुगडे, मसू पाटील, दतात्रय चौगले, दत्तात्रय सोनाळकर, नंदकुमार घोरपडे, संचालिका राजश्री चौगले, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

सदाशिवराव मंडलिक कारखान्यातील साखर पोत्यांचे पूजन करताना उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, यावेळी उपस्थित संचालक आदी.

छाया - जे. के. फोटो, सुरुपली

Web Title: Concluding Season of Mandlik Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.