कोल्हापुरातील १८ प्रभागांत कोरोनाची स्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:56+5:302021-05-21T04:23:56+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाची साखळी काही केल्या तुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील ८१ पैकी १८ प्रभागांतील ...
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाची साखळी काही केल्या तुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील ८१ पैकी १८ प्रभागांतील कोरोना परिस्थिती अजूनही गंभीर असून, या प्रत्येक प्रभागात गेल्या १० दिवसांत ४० ते १०० पर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत १० हजार ५०० नव्या रुग्णांची भर पडल्याने वर्षभरातील एकूण रुग्णांची संख्या २७ हजार ४३० वर जाऊन पोहोचली. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा चार महिन्यांत कोराेनाचा संसर्ग एकदम कमी झाला होता. तिसरी लाट येणार असल्याचा अंदाजही राज्य सरकारने व्यक्त केला होता; तसेच उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र मार्च महिन्यापासून चित्र गंभीर होत चालल्याची जाणीव झाली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असले तरी ते अपुरे असून रुग्णसंख्या वाढतच आहे. मागच्या दोन महिन्यांत कोरोनाने सर्वच प्रभागांवर आपला वरचष्मा निर्माण केला आणि त्याच वेळी सर्व यंत्रणा विस्कळित करून टाकली. गेल्या १० दिवसांत म्हणजे दि. ९ मेपासून ते बुधवारपर्यंत शहरात २६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यावरूनच रोज सरासरी २६० च्या आसपास नवे रुग्ण समोर येत आहेत. इतर जिल्ह्यांतील ७१ व इतर राज्यांतील २४ कोरोना रुग्णांची नोंद महापालिकेच्या हद्दीत झाली आहे.
असे आहेत हे १७ प्रभाग
राजारामपुरी : १२६
संभाजीनगर : १२१
कैलासगडची स्वारी मंदिर : ९१
ताराबाई पार्क : ८७
साने गुरुजी वसाहत : ७६
फुलेवाडी : ७०
खोल खंडोबा : ६९
कदमवाडी : ६४
कसबा बावडा हनुमान तलाव : ६२
कसबा बावडा पूर्व बाजू : ५७
रामानंदनगर-जरगनगर : ५७
नाथा गोळे तालीम : ४७
स्वातंत्र्यसैनिक वसाहत : ४६
शाहूपुरी तालीम : ४६
सदर बाजार : ४६
जवाहरनगर : ४५
साळोखेनगर : ४५
कळंबा फिल्टर हाऊस : ४५