हातकणंगले पंचायत समितीत सभापती - गटविकास अधिकाºयामध्ये संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 10:50 PM2017-11-09T22:50:12+5:302017-11-09T22:59:00+5:30

हातकणंगले : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या तपासणीसाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी फिरकत नाहीत. प्रत्येक महिना आणि एक वर्षात किती ग्रामपंचायतींची तपासणी झाली

 Conflicts between Chairman and Group Development Officer in Hatkanangle Panchayat Committee | हातकणंगले पंचायत समितीत सभापती - गटविकास अधिकाºयामध्ये संघर्ष

हातकणंगले पंचायत समितीत सभापती - गटविकास अधिकाºयामध्ये संघर्ष

Next
ठळक मुद्देग्रामसेवक गावच्या पैशाचे मालक होत असताना याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेतगावासाठी दीर्घ काळ टिकणारी योजना शासन दरबारी हेलपाटे मारूनच पदरी पाडून घ्यावी लागते. तपासणी महत्त्वाची असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष

दत्ता बिडकर ।
हातकणंगले : तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या तपासणीसाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी फिरकत नाहीत. प्रत्येक महिना आणि एक वर्षात किती ग्रामपंचायतींची तपासणी झाली याबाबत अधिकारी अनभिज्ञ आहेत. ग्रामपंचायतीचे शेरा बुक कार्यालयात आणण्यास सांगून शेरे मारायचे आणि ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचे प्रकार वाढल्यामुळे गावच्या विकासाच्या योजना आणि जनसुविधा कागदावर दिसत आहेत. गटविकास अधिकाºयांनी तपासलेल्या ग्रामपंचायतींची सभापतींनी भेट देऊन माहिती घेतली असता दोघांमध्येच अंतर्गत कलहाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने थेट ग्रामपंचायतींनाच विकासकामांसाठी निधी दिल्यामुळे ग्रामपंचायत कोणत्याही योजना राबविण्यास सक्षम आणि स्वयंपूर्ण झाल्या आहेत. गावामध्ये पिण्याचे पाणी, रस्ते, गटर, वीज या नियमित अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी गावपातळीवरील सरपंच आणि स्थानिक सदस्य नेहमी अग्रेसर असतात. मात्र, गावासाठी दीर्घ काळ टिकणारी योजना शासन दरबारी हेलपाटे मारूनच पदरी पाडून घ्यावी लागते. यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची गरज लागते. पंचायत समितीचा विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून विकासाच्या योजना पुढे सरकत असतात. यासाठी शासनाने प्रत्येक महिन्या, दोन माहिन्याला पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयाने, तर वर्षातून किमान चार वेळा गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन झालेल्या कामकाजाची तपासणी अगर आढावा घेण्याची ग्रामविकास विभागाने तरतूद केलेली आहे. ग्रामपंचायतीला दिलेल्या भेटीची नोंद शेरे बुकमध्ये करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिलेल्या असताना याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.

चौदाव्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी ग्रामपंचायतीकडे गेली दोन वर्षे पडून आहे. या निधीचा काय विनयोग केला, निधी का खर्च झाला नाही याची तपासणी होणे गरजेचे असताना याकडे पंचायत समितीचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. दलित वस्ती सुधार योजनेची अनेक कामे वस्तीबाहेर आणि योग्य ठिकाणी झालेली नाहीत. याबाबतही कोणी तपासणी करीत नाही.

अनेक गावांमध्ये ग्रामनिधीच्या रकमेचा वारेमाप खर्च दाखविला जातो. याची दरपत्रके, मूल्यांकने आणि विनियोग तपासले जात नाहीत. ग्रामसेवक औपचारिकता म्हणून ग्रामपंचायतीची खर्चाला मंजुरी घेतात. मात्र, हा खर्च योग्य कीअयोग्य ठरविण्यासाठी विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाºयांची तपासणी महत्त्वाची असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामनिधी आणि पाणीपुरवठा व स्वच्छता या दैनंदिन कॅशबुकवर पाचशे रुपयांची हातशिल्लक ठेवण्याची ग्रामपंचायत कायद्यात तरतूद असताना अशा कॅश बुकवर हजारो रुपयांचा निधी हातशिल्लक ठेवून ग्रामसेवक गावच्या पैशाचे मालक होत असताना याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

कागदोपत्रीच तपासणीचा आरोप
ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी विस्तार अधिकारी किंवा गटविकास अधिकारी कधीच ग्रामपंचायतीमध्ये जाऊन करीत नाहीत, असा अरोप होत असून, ग्रामसेवकांचे शेरे बुक पंचायत समितीमध्येच घेऊन त्यावर तपासणीचे शेरे मारून कागदोपत्री वरचे वर तपासणीचा अधिकारी फार्स करीत असल्याचा आरोप सभापतींकडून होत असल्यामुळे गटविकास अधिकारी आणि सभापती यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे.

Web Title:  Conflicts between Chairman and Group Development Officer in Hatkanangle Panchayat Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.