इतिवृत्त मंजुरीवरून चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:13 AM2019-01-28T00:13:53+5:302019-01-28T00:13:57+5:30

कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजुरीवरून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभेत रविवारी सभासदांनी तुफान गोंधळ ...

Confusion in the film corporation meeting from the anniversary sanction | इतिवृत्त मंजुरीवरून चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ

इतिवृत्त मंजुरीवरून चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ

googlenewsNext

कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजुरीवरून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभेत रविवारी सभासदांनी तुफान गोंधळ घातला. सत्ताधाऱ्यांनी ‘मंजूर’चा, तर विरोधकांनी ‘नामंजूर’चा ठेका धरत थेट व्यासपीठावरच धाव घेतली. अर्ध्या तासाच्या गोंधळातच हात उंचावून इतिवृत्त मंजुरीची सत्ताधाºयांनी यशस्वी खेळी खेळली. दरम्यान याच सभेत महामंडळाची घटनादुरुस्ती मंजूर झाली. राज्य सरकारच्या धर्तीवर महामंडळाचा स्वतंत्र पुरस्कार वितरण सोहळा असेल. त्यासाठी ५० लाखांच्या तरतुदीलाही सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिरात झाली. मेघराज राजेभोसले हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह रणजित भोसले यांनी २०१५ सालच्या सभेचे इतिवृत्त वाचून ते मंजुरीसाठी ठेवले. लगेच सत्ताधारी गोटाने ‘मंजूर... मंजूर’चा धोशा लावला. याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला. अन्य सदस्यांनी व्यासपीठावर जाऊनच अध्यक्षांना जाब विचारला. यावर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. या गोंधळातच इतिवृत्त मंजूर झाल्याने राजेभोसले यांनी जाहीर केले. अर्ध्या तासाहून अधिक काळ गोंधळ सुरु होता.
सभेतील प्रमुख निर्णय
एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळविणाºया चित्रपटांना सरकारी अनुदान नाही, ‘पेटा’चे कार्यालय मुंबईत करण्यासाठी पाठपुरावा, नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाप्रमाणे राज्यात व कोल्हापुरातही मराठी स्कूल आॅफ ड्रामा, सुलोचनादीदींना फाळके,तर राजदत्त यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी आग्रह, शॉर्टफिल्म फेस्टिव्हलना महामंडळाची परवानगी बंधनकारक, निर्माते, लेखक यांच्यासह निर्मात्यांची रामोजी फिल्मसिटीत कार्यशाळा, तिकीटावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा, कोल्हापुरात अद्ययावत तर पुणे, मुंबईत स्वमालकीचे कार्यालय होणार इत्यादी निर्णय घेतले.

Web Title: Confusion in the film corporation meeting from the anniversary sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.