मुख्याध्यापक संघाच्या सभेत गोंधळ : हमरी-तुमरी, ढकलाढकलीचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:12 PM2020-12-08T15:12:43+5:302020-12-08T15:16:21+5:30

kolhapur, Education Sector, Teacher विरोध झुगारून जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सभेत मंगळवारी नवीन कार्यकारिणी मंजूरी झाली. या कार्यकारिणी निवडीसाठी मतदान घेण्याच्या पध्दतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली.

Confusion in the meeting of the headmaster's team: Hamri-Tumri, a form of pushing and shoving | मुख्याध्यापक संघाच्या सभेत गोंधळ : हमरी-तुमरी, ढकलाढकलीचा प्रकार

मुख्याध्यापक संघाच्या सभेत गोंधळ : हमरी-तुमरी, ढकलाढकलीचा प्रकार

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाच्या सभेत गोंधळ : हमरी-तुमरी, ढकलाढकलीचा प्रकारविरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर

 कोल्हापूर : विरोध झुगारून जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सभेत मंगळवारी नवीन कार्यकारिणी मंजूरी झाली. या कार्यकारिणी निवडीसाठी मतदान घेण्याच्या पध्दतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. सत्ताधारी- विरोधक समर्थकांमध्ये हमरी-तुमरी, ढकलाढकली, एकमेकांच्या विरोधातील घोषणा अशा गोंधळाच्या वातावरणात अवघ्या अर्ध्या तासात सभा पार पडली.

येथील विद्याभवनमधील सभागृहात सकाळी अकरा वाजता मुख्याध्यापक संघाची ७६ वी वार्षिक सभा सुरू झाली. अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला. सचिव दत्ता पाटील यांनी विषयांचे वाचन केले. त्यांनी जमाखर्च पत्रकाच्या मंजुरीचा विषय मांडला.

दत्ता पाटील यांनी नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मांडताच त्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली नसल्याचे सांगत विरोधकांतील व्ही. जे. पोवार, आर. वाय पाटील, आदींनी या विषयाला विरोध केला. पण, हात उंचावून मतदान घेण्यावर सत्ताधारी ठाम राहिले.

त्यातून वादावादी आणि खडाजंगी झाली. त्यात विरोधकांतील काहींनी व्यासपीठावर जावून माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना समर्थकांनी रोखले. व्यासपीठाखाली दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये हमरी-तुमरी, ढकलाढकली सुरू झाली. विरोधकांनी हुकुमशाही, दडपशाहीचा धिक्कार असो अशा, तर सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा विजय असो अशा घोषणा सुरू केल्या. त्यातच सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी हात उंचावून मत नोंदवित नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मंजूर केला. या गोंधळात सभा संपली.

Web Title: Confusion in the meeting of the headmaster's team: Hamri-Tumri, a form of pushing and shoving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.