अभिज्ञा पाटील हिचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:44+5:302021-04-08T04:25:44+5:30
अभिज्ञा हिचे शिक्षण 'पूनावाला' स्कूलमध्ये झाले. येथे तिच्यासाठी स्कूलने 'रायफल शूटिंग रेंज' तयार केली ...
अभिज्ञा हिचे शिक्षण 'पूनावाला' स्कूलमध्ये झाले. येथे तिच्यासाठी स्कूलने 'रायफल शूटिंग रेंज' तयार केली होती. त्याचा अभिज्ञाला फायदा झाला होता. डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असते. अभिज्ञाला आतापर्यंत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ४५ सुवर्ण, १३ रौप्य , १५ कांस्य पदके मिळाली आहेत.
अध्यक्षा विद्या पोळ यांच्या हस्ते अभिज्ञाचा सत्कार करण्यात आला तसेच वडील अशोक पाटील आणि आई प्रतिभा पाटील यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना यावेळी अभिज्ञा पाटील म्हणाली,पूनावाला स्कूलने पाया भक्कम केल्यामुळे आतापर्यंतचे यश मिळविता आले. स्कूलची मूल्ये, संस्कार आणि शिकवण कधीच विसरू शकत नाही.
यावेळी विद्या पोळ,डाॅ सरदार जाधव, अशोक पाटील यांची भाषणे झाली. प्रास्ताविक चित्रा हगलहोले यांनी केले. सूत्रसंचालन यशवंत बोराटे यांनी तर सागर फरांदे यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य मारुती कामत, डॉ. माधवी सावंत आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------
पेठवडगाव येथील डॉ. सायरस पूनावाला स्कूलची माजी विद्यार्थिनी अभिज्ञा अशोक पाटील हिची जपान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करताना माजी नगराध्यक्षा विद पोळ, शेजारी प्राचार्य मारुती ईआमत, डाॅ. सरदार जाधव, प्रतिभा पाटील, अशोक प्राचार्य आदी उपस्थित होते. (छाया : क्षितिज जाधव)