वारणा शिक्षण मंडळातर्फे शिवाजी विद्यापीठाचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:31+5:302021-04-16T04:25:31+5:30
वारणानगर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद “नॅक”च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाने ए प्लस प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल येथील ...
वारणानगर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद “नॅक”च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाने ए प्लस प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. वारणा शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी त्यांचा सत्कार केला.
वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी विद्यापीठाशी निगडित सर्व घटकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तात्यासाहेब कोरे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर उपस्थित होते.
फोटो ओळी -
शिवाजी विद्यापीठाने नुकत्याच जाहीर झालेल्या नॅक मानांकनात ए प्लस मिळविल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा सत्कार वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी केला. सोबत तात्यासाहेब कोरे (स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांनी केला.