कोगनोळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 06:58 PM2020-12-31T18:58:27+5:302020-12-31T19:02:40+5:30
Grampanchyat Election Kognoli Karnatka- आज पर्यंत एकहाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीने कोगनोळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ३२ पैकी २५ जागांवर विजय मिळवत आपला गड अबाधित राखला आहे. भाजपप्रणित परिवर्तन आघाडीने ७ जागा मिळवत गावच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : आज पर्यंत एकहाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीने कोगनोळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ३२ पैकी २५ जागांवर विजय मिळवत आपला गड अबाधित राखला आहे. भाजपप्रणित परिवर्तन आघाडीने ७ जागा मिळवत गावच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.
कोगनोळी ग्राम पंचायतीच्या रविवार दि २७ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल बुधवार दि ३० रोजी हाती आला. ३२ जागांपैकी परिवर्तन आघाडीला एस टी प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने ग्रामविकास आघाडीच्या मंगल नाईक यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर ३१ जागांसाठी ७० उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.
यापैकी ग्राम विकास आघाडीने २४ तर परिवर्तन आघाडीने ७ जागांवर विजय संपादन केला. विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी टी टी नाडकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विजयी उमेदवार
ग्रामविकास आघाडी
- राजश्री ज्ञानेश्वर डांगरे
- दादासो सुरगोंडा माणगावे
- सुनिता रामदास गाडेकर
- अनिता कृष्णात भोजे
- तात्यासो सिद्राम कागले
- रूपाली सुकुमार वडर
- छाया संजय पाटील
- दिलीप रघुनाथ पाटील
- राजगोंडा बाबुराव पाटील
- धनंजय बाबुराव पाटील
- अक्काताई आप्पासो खोत
- विश्वजीत भिवाजी लोखंडे
- कृष्णात शिवाजी खोत
- कल्पना विनोद आवटे
- राजेंद्र साताप्पा शिंत्रे
- युवराज भाऊसो कोळी
- वनिता संजय खोत
- प्रवीण दिनकर भोसले
- महादेवी प्रशांत पोवाडे
- महेश राजेंद्र जाधव
- सुनील लक्ष्मण कागले
- सचिन आनंदा खोत
- आक्काताई संजय डूम
- तुकाराम आनंदा शिंदे
- जंगल शिवाजी नाईक (बिनविरोध)
परिवर्तन आघाडी
- सुनील शामराव माने
- सुजित संतराम माने
- स्वाती प्रीतम शिंत्रे
- विद्या कुंभार व्हटकर
- शोभा महावीर माणगावे
- मनीषा सचिन परीट
- वंदना सचिन चौगुले