इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

By समीर देशपांडे | Published: November 17, 2024 04:29 PM2024-11-17T16:29:16+5:302024-11-17T16:29:56+5:30

शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे काम

Congress policy of inciting caste conflicts like the British; Attack of Yogi Adityanath | इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

कोल्हापूरइंग्रजांनी ज्याप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ नीती वापरली. त्यांचाच अंश असलेल्या कॉंग्रेसने जातीजातीत भांडणे लावण्याचे धोरण आखले आहे. देव, देश आणि धर्म याबद्दल आस्था नसणाऱ्या कॉंग्रेसवर विश्वास न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

येथील तपोवन मैदानावर रविवारी दुपारी प्रचंड गर्दीत ही सभा झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, उमेदवार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, माजी आमदार जयश्री जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजप अमल महाडिक आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते अश्वारूड शिवपुतळा देवून योगी यांचे स्वागत करण्यात आले. 

योगी म्हणाले, २०१४ च्या आधी पाकिस्तानचे अतिरेकी कधीही देशात घुसायचे. देशात हल्ले व्हायचे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे सर्व बंद झाले. कारण हा नवा भारत आहे. ‘छेडेंगे नही, पर छाेडेंगे नही’असा हा भारत आहे. अयोध्येमध्ये कॉंग्रेसही राममंदिर बांधू शकली असती. परंतू त्यांनी ते बांधलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण सिध्दांतावर आधारित होते. परंतू उध्दव ठाकरे या सगळ्यापासून दूर गेले.

राज्यात पुन्हा महायुती सत्तेवर आल्यानंतर मग गणपतीबाप्पाच्या मिरवणुकीवर, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करणारे घरात बसतील. बाहेर आले तर ‘राम नाम सत्य है’ हे उत्तर प्रदेशचे सूत्र त्यांना लागू होईल. महायुती सत्तेवर आल्यावर विशाळगडावरील अतिक्रमणेही आपोआप निघतील, असंही योगी यावेळी म्हणाले.

 

Web Title: Congress policy of inciting caste conflicts like the British; Attack of Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.