ओबीसींच्या आरक्षणप्रश्नी इचलकरंजीत काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:58+5:302021-06-27T04:16:58+5:30
इचलकरंजी : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी ...
इचलकरंजी : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
राजकीय आरक्षणामुळे ओबीसी समाजातील अनेक घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगल्या संधी मिळत होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. वास्तविक मागास आयोगाचा डाटा केंद्र सरकारने दिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याचा आरोप करत इचलकरंजीत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर यांनी १९९४पासून ओबीसी समाजातील विविध घटकांना राजकीय आरक्षण मिळत होते, पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप केला. नगरसेवक राहुल खंजिरे यांनी भाजप सरकारने मागास असलेला अहवाल न्यायालयात सादर करावा. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत केंद्र सरकारविरोधात लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात काँग्रेसच्या शहराध्यक्ष मीना बेडगे, अमरजित जाधव, शशिकांत देसाई, प्रमोद मुसळे, राजन मुठाणे, बाबासाहेब कोतवाल, समीर शिरगावे, प्रमोद पाटील, राजू आवळे, हरिष शेरीगार, प्रशांत लोले सहभागी झाले होते.