काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

By admin | Published: April 16, 2017 12:43 AM2017-04-16T00:43:38+5:302017-04-16T00:43:38+5:30

जाधव यांच्या सुटकेची मागणी : दिवसभरात नोंदविल्या दहा हजार स्वाक्षऱ्या

Congress signature campaign | काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

Next

इचलकरंजी : महाराष्ट्राचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी व इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे शनिवारी स्वाक्षरी मोहीम घेतली. त्याअंतर्गत जमा केलेल्या सह्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देऊन भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करून जाधव यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी केली. दिवसभरात १0 हजार स्वाक्षऱ्या नोंदविण्यात आल्या.
माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा सुनावली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग करून जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेचा निषेध करीत त्यांची तातडीने सुटका करावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेस यांच्यावतीने स्वाक्षरी मोहिमेस इचलकरंजीत प्रारंभ केला.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी स्वाक्षरी करून या अभियानाला सुरुवात केली. अभियानासाठी कबनूर, कोरोची, चंदूर, खोतवाडी, तारदाळसह शहरातील लिंबू चौक, मराठा चौक, मरगुबाई मंदिर, नदीवेस, शहापूर चौक, कॉ. के. एल. मलाबादे चौक, थोरात चौक, सुतारमळा, सांगली नाका, तीनबत्ती चौक, कामगार चाळ, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी,
आदी ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते.
तसेच शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थी, विद्यार्थिनींना या अभियानात सहभागी करून घेतले. स्वाक्षऱ्यांचे निवेदन शिरस्तेदार मनोज ऐतवडे यांना शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी सुपूर्द केले.
यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, संजय केंगार, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पै. अमृत भोसले, राजू बोंद्रे, आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाश सातपुते, अशोकराव सौंदत्तीकर, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)


काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, अमृत भोसले, राजू बोंद्रे, आदी उपस्थित होते.

Web Title: Congress signature campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.