केंद्रात सन २०२४ ला काँग्रेसचीच सत्ता असेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:47+5:302021-08-13T04:28:47+5:30

इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्ता मिळवली. त्यांच्या धोरणामुळे जाती-धर्मात तेढ निर्माण झाले. ...

The Congress will be in power at the Center in the year 2024 | केंद्रात सन २०२४ ला काँग्रेसचीच सत्ता असेल

केंद्रात सन २०२४ ला काँग्रेसचीच सत्ता असेल

Next

इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्ता मिळवली. त्यांच्या धोरणामुळे जाती-धर्मात तेढ निर्माण झाले. मोदी सरकारच्या धोरणाला जनता कंटाळली असून, सन २०२४ मध्ये केंद्रात काँग्रेसचीच सत्ता असणार याची खूणगाठ बांधून कार्यकर्त्यांनी काँग्रेस बळकटीसाठी सज्ज राहावे. तसेच इचलकरंजी नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

इचलकरंजी शहर काँग्रेस समितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकार येतात आणि जातातही. मात्र, काँग्रेसला १३५ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असून काँग्रेस अद्याप स्थिरस्थावर आहे. सध्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना प्रदेश काँग्रेसच्या वतीने जीवनावश्यक धान्य आणि संसारोपयोगी साहित्य वाटप सुरू आहे. त्यासाठी इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी तीन ट्रक साहित्य आणले असून वाटप सुरू असल्याचेही हंडोरे यांनी सांगितले. येथील काँग्रेस समितीच्या वास्तूला मोठी परंपरा आहे. अनेक स्थित्यंतरानंतरही कष्टकरी, शेतकरी, वंचितांना सोबत घेऊन इचलकरंजीत काँग्रेस बळकटीसाठी प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक राहुल खंजिरे व शशांक बावचकर यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय कांबळे, शहराध्यक्षा मीना बेडगे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी

१२०८२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजी शहर काँग्रेस समितीत आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर, मीना बेडगे, रवी रजपुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The Congress will be in power at the Center in the year 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.