काँगे्रस आघाडीसोबत गद्दारी करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:56 AM2019-02-04T00:56:21+5:302019-02-04T00:56:27+5:30
आजरा : काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी लोकसभेला जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत काँगे्रस आघाडीसोबत ...
आजरा : काँगे्रस, राष्ट्रवादी आघाडी लोकसभेला जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत काँगे्रस आघाडीसोबत गद्दारी करणार नसल्याचे प्रतिपादन काँगे्रसचे माजी आमदार
पी. एन. पाटील यांनी केले.
येथील अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांची अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल आयोजित सर्वपक्षीय सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.
पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत असताना ‘गोकुळ’मुळे शेतकºयांचा संसार चालत आहे. अरुण डोंगळे यांना तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची संधी दिली. मात्र, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आपटे यांचे नेतृत्व आणि त्यांनाही तीन वर्षांची संधी मिळावी म्हणून अध्यक्षपदी निवड केली. लहान ताुलक्याला मोठे पद दिल्याने आपटे यांनी संधीचे सोने करावे.
खासदार महाडिक म्हणाले, आपटे यांचे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. गोकुळमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतकºयांना आर्थिक आधार मिळाला आहे, त्यामुळे आत्महत्या होत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादने वाढविण्याची आपटे यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून लोकसभेला मदत करण्याचे आवाहन महाडिक यांनी केले.
यावेळी पी. एन. पाटील व खासदार महाडिक यांच्या हस्ते आपटे यांचा सत्कार करण्यात झाला. आपटे, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, अशोक चराटी, अरुण डोंगळे, उमेश आपटे, सागर देशपांडे नामदेव नार्वेकर, मसणू सुतार, महादेव पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी सभापती रचना होलम, उद्योजक रमेश रेडेकर, श्रीपतराव देसाई, राजेश पाटील, डॉ. अनिल देशपांडे, आलम नाईकवाडे, रामराजे कुपेकर, दशरथ अमृते, मनीषा गुरव, अंकुश पाटील, जयश्री पाटील, आदी उपस्थित होते. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. संजय सावंत आभार मानले.