महाडिकांवर काँग्रेसचे लक्ष

By Admin | Published: October 26, 2015 12:45 AM2015-10-26T00:45:13+5:302015-10-26T00:49:33+5:30

योग्यवेळी कारवाई : अशोक चव्हाण यांची माहिती; काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळतील-- ‘अहो, महाडिकजी तुम्ही इकडे कसे...?

Congress's attention on Mahadik | महाडिकांवर काँग्रेसचे लक्ष

महाडिकांवर काँग्रेसचे लक्ष

googlenewsNext

कोल्हापूर : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील पक्षविरोधी कारवायांबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी पक्ष त्यांच्यावर कारवाई करील, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.महापालिका निवडणुकीत काँग्रेसच सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेचा हक्कदार असेल, असा दावाही चव्हाण यांनी केला. प्रचारसभेनंतर रात्री उशिरा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. त्यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, सुरेश कुराडे, आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीत महाडिक यांची नेमकी भूमिका काय आहे याची माहिती घेतली जात आहे. आपण कोणत्याच पक्षाच्या प्रचारात सक्रिय नसल्याचे ते सांगत आहेत; परंतु आजच आम्हाला काहीजणांनी ते ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सक्रिय झाल्याच्या वृत्तपत्रांतील बातम्यांची कात्रणे दाखवली. त्यामुळे ते सध्या काय करत आहेत याकडे पक्षाचे लक्ष आहे. या निवडणुकीनंतर योग्यवेळी त्यांच्यावर कारवाईबाबत पक्ष निर्णय घेईल.’
महाडिक काय करत आहेत यावर पतंगराव कदम यांचे जास्त चांगले लक्ष आहे. सारखे इकडे-तिकडे करू नका. एकतरी आमच्याकडे राहून पक्षाचे काम करा नाहीतर त्यांच्याकडे तरी जावा.’कोल्हापुरात सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष ताकदीने मैदानात उतरला असून कोणत्याही स्थितीत सर्वात मोठा पक्ष बनण्याची संधी काँग्रेसलाच आहे. कोल्हापूरने आतापर्यंत काँग्रेसला चांगली साथ दिली आहे. भाजप सरकारकडून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख इतक्या लवकर खाली उतरेल असे वाटले नव्हते. मी मुख्यमंत्री असताना नांदेडला गुरुता गद्दी सोहळ््याच्या निमित्ताने खास बाब म्हणून तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला. कोल्हापूरचे धार्मिक व ऐतिहासिक क्षेत्रातील स्थान तितकेच असताना या शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश होऊ शकला नाही. विशेष बाब म्हणून कोल्हापूरचा समावेश व्हायलाच हवा होता असेही मत चव्हाण यांनी नोंदविले.


सत्तेत शिवसेनेची कुचंबणा
राज्यातील सत्तेत शिवसेनेची कुचंबणा होत आहे. त्यांना सत्तेतही राहायचे आहे व विरोधही करायचा आहे. सरकारमधील सामूहिक जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. शिवसेनेने असेल ताकद तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयास विरोध करून दाखवावा, नाहीतर सत्तेतून बाहेर पडावे, असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले.

‘अहो, महाडिकजी तुम्ही इकडे कसे...?’ - वृत्त २

Web Title: Congress's attention on Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.