काँग्रेसचे ‘धक्का मार आंदोलन’-- इचलकरंजीत सायकल, दुचाकींसह मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:36 AM2017-09-17T00:36:40+5:302017-09-17T00:38:34+5:30

इचलकरंजी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरात सातत्याने वाढ करून जनतेला महागाईच्या गर्तेत लोटणाºया केंद्र व राज्य सरकारचा निषेध

Congress's 'Dhakka Mar Aagolan' - Ichalkaranjeet cycle, front row with two-wheelers | काँग्रेसचे ‘धक्का मार आंदोलन’-- इचलकरंजीत सायकल, दुचाकींसह मोर्चा

काँग्रेसचे ‘धक्का मार आंदोलन’-- इचलकरंजीत सायकल, दुचाकींसह मोर्चा

Next
ठळक मुद्दे महागाई, पेट्रोल दरवाढीचा विरोध :जनतेची फसवणूक करणाºया भाजप सरकारचा धिक्कार असो,

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पेट्रोल, डिझेल व गॅस दरात सातत्याने वाढ करून जनतेला महागाईच्या गर्तेत लोटणाºया केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवत इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने सायकल चालवत व दुचाकी वाहनांना ढकलत नेत ‘धक्का मार आंदोलन’ करण्यात आले.
येथील काँग्रेस कमिटीपासून मलाबादे चौकापर्र्यंत एका बैलगाडीत दुचाकी ठेऊन, तसेच सायकलसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहने ढकलत नेण्यात आली. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेच्या खिशावर डल्ला मारणाºया सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. शेजारील राज्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर अत्यंत कमी असताना महाराष्ट्रात ते अधिक आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किलीचे केले आहे.

शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. जयहिंद मंडळापासून मुख्य मार्गाने मोर्चा मलाबादे चौकात आला. याठिकाणी मोदी हटाव देश बचाव, चले जाव चले जाव, जनतेची फसवणूक करणाºया भाजप सरकारचा धिक्कार असो, आदी घोषणांनी चौक दणाणून सोडला.
आंदोलनात नगरसेवक शशांक बावचकर, अहमद मुजावर, महावीर कुरुंदवाडे, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, महावीर केटकाळे, नरसिंह पारीक, सायली लायकर, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, आदींसह शहर काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress's 'Dhakka Mar Aagolan' - Ichalkaranjeet cycle, front row with two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.