सभापती निवडीत काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Published: September 15, 2014 12:24 AM2014-09-15T00:24:06+5:302014-09-15T00:24:39+5:30

हातकणंगले, पन्हाळा निवडी चिठ्ठीवर : शाहूवाडीत संख्याबळ असूनही सत्यजीत पाटील गटाकडे सत्ता नाही

Congress's top election | सभापती निवडीत काँग्रेसचा वरचष्मा

सभापती निवडीत काँग्रेसचा वरचष्मा

Next

कोल्हापूर : पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत काँग्रेसने बारापैकी सहा पंचायत समित्या आपल्या ताब्यात ठेवत वरचष्मा कायम राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर ‘स्वाभिमानी’ने शिरोळची सत्ता कायम ठेवली, तर ‘जनसुराज्य’ला पन्हाळ्याची सत्ता अडीच वर्षांनंतर चिठ्ठीवर मिळाली. हातकणंगले येथे समसमान बलाबलमुळे चिठ्ठीवर कॉँग्रेसने बाजी मारली.
चंदगडमध्ये माजी आमदार नरसिंगराव पाटील गटाच्या ज्योती पाटील यांची सभापती, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील गटाचे शांताराम पाटील यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.
राधानगरी व भुदरगडमध्ये दोन्ही काँग्रेसची समझोता एक्स्प्रेस कायम राहिली. राधानगरीमध्ये ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या पत्नी व आमदार के. पी. पाटील यांच्या कन्या रूपाली पाटील यांची सभापती, तर कॉँग्रेसच्या सुप्रिया साळोखे यांची उपसभापतिपदी निवड झाली.
भुदरगडमध्ये राष्ट्रवादीचे विलास कांबळे सभापती, तर कॉँग्रेसच्या रतिपौर्णिमा कामत उपसभापती झाल्या. कागलमध्ये संजय घाटगे गटाचे श्रीकांत लोहार सभापती, तर सदाशिवराव मंडलिक गटाचे भूषण पाटील यांची उपसभापती म्हणून फेरनिवड करण्यात आली. गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या अनुसया सुतार यांची सभापती, तर तानाजी कांबळे यांची उपसभापतिपदी निवड झाली. शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शीला दिलीपकुमार पाटील यांची सभापती, तर अनिता अमरसिंह माने यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.
गगनबावडामध्ये कॉँग्रेसचे तानाजी पाटणकर यांची सभापती, तर मावळते सभापती शालिनी शेळके यांची उपसभापतिपदी निवड झाली. करवीरमध्ये काँग्रेसच्या पूनम जाधव यांची सभापतिपदी, तर दत्तात्रय मुळीक यांची उपसभापतिपदी फेरनिवड करण्यात आली.
हातकणंगलेचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने येथे जोरदार रस्सीखेच झाली. येथे ११-११ बलाबल झाल्याने सभापती, उपसभापती निवडी चिठ्ठीवर घेण्यात आल्या. कॉँग्रेसचे राजेश पाटील व राष्ट्रवादीचे (माने गट) प्रमोदिनी पाटील यांची उपसभापतिपदी निवड झाली. पन्हाळ्यामध्येही समान बलाबलमुळे चिठ्ठीवर ‘जनसुराज्य’ने अडीच वर्षांनंतर सत्ता हस्तगत केली. शाहूवाडीचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. येथे सत्तारूढ सत्यजित पाटील गटाकडे या प्रवर्गातील सदस्य नसल्याने कॉँग्रेसचे पंडित नलवडे यांनी बाजी मारली. उपसभापतिपदी पाटील गटाचे नामदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.(प्रतिनिधी)

शाहूवाडीअनूसूचित जातीपंडित नलवडे कॉँग्रेसनामदेव पाटीलसरूडकर गटकाँग्रेस-२, सरूडकर-५, जनसुराज्य-१
आजराओबीसी पुरुषविष्णुपंत केसरकर राष्ट्रवादीदीपक देसाईकाँग्रेस राष्ट्रवादी-४, काँग्रेस-२
गगनबावडासर्वसाधारणतानाजी पाटणकरकॉँग्रेसशालिनी शेळकेकॉँग्रेसकाँग्रेस-३, राष्ट्रवादी-१
पन्हाळासर्वसाधारण महिलासुनीता पाटीलजनसुराज्यरवींद्र जाधवजनसुराज्यजनसुराज्य-६, काँग्रेस-२,
नरके गट-३, राष्ट्रवादी-१
करवीरसर्वसाधारण महिलापूनम जाधवकाँग्रेसदत्तात्रय मुळीककाँग्रेसकाँग्रेस-१३, शिवसेना-३, शेकाप-२,
जनसुराज्य, स्वाभिमानी, अपक्ष-१
शिरोळओबीसी महिलाशीला पाटीलस्वाभिमानीअनिता माने स्वाभिमानीस्वाभिमानी शेतकरी संघटना-८,
काँग्रेस-राष्ट्रवादी-६, अपक्ष-२
हातकणंगलेसर्वसाधारणराजेश पाटीलकाँग्रेसप्रमोदिनी पाटीलराष्ट्रवादीकाँग्रेस-८, शिवसेना-भाजप-४,
जनसुराज्य-४, राष्ट्रवादी-५, अपक्ष-१
गडहिंग्लजसर्वसाधारणअनुसया सुतारराष्ट्रवादी तानाजी कांबळराष्ट्रवादीराष्ट्रवादी-८, जनसुराज्य-१,
जनता दल-१
राधानगरीसर्वसाधारणरूपाली पाटीलराष्ट्रवादीसुप्रिया साळोखेकाँग्रेसराष्ट्रवादी-४, जनता दल-१,
स्वाभिमानी-१, काँग्रेस-४
भुदरगडअनुसूचित जातीविलास कांबळेराष्ट्रवादीरतिपौर्णिमा कामतकाँग्रेसकॉँग्रेस-४, राष्ट्रवादी-४
कागलओबीसी पुरुषश्रीकांत लोहारकाँग्रेसभूषण पाटीलकाँग्रेसकाँग्रेस-७, राष्ट्रवादी-२, घाटगे गट-१
चंदगडसर्वसाधारण महिलाज्योती पाटीलकाँग्रेसशांताराम पाटीलकाँग्रेसकाँग्रेस-६, राष्ट्रवादी-४



 

Web Title: Congress's top election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.