पंचगंगा, भोगावती नदीत उपसाबंदी

By admin | Published: January 3, 2016 11:58 PM2016-01-03T23:58:43+5:302016-01-04T00:40:52+5:30

पाटबंधारे विभागाचा आदेश : ८ तारखेपासून अंमलबजावणी; संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन निर्णय

Conjunction in Panchganga, Bhogavati river | पंचगंगा, भोगावती नदीत उपसाबंदी

पंचगंगा, भोगावती नदीत उपसाबंदी

Next

प्रकाश पाटील-कोपार्डे --कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्यावतीने जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांसाठी पंचगंगा व भोगावती नदीतून शेतीसाठी सलग आठ दिवस पूर्ण उपसाबंदीचे वेळापत्रक जाहीर आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा व संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांतून मात्र पूर्ण उपसाबंदी करण्यापेक्षा हा कालावधी कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठ्यात कमालाची घट झाली आहे. जिल्ह्यात उसाचे व रब्बीचे मोठे क्षेत्र असल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच नदीकाठावरील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी उपसाला सुरुवात केली. यामुळे जानेवारीनंतर मुख्य धरणातून नद्यांमध्ये पाणी सोडण्याऐवजी यावर्षी नोव्हेंबरपासूनच पाणी सोडण्याची वेळ पाटबंधारे विभागाला आली आहे.
सध्या राधानगरी, दुधगंगा (काळम्मावाडी), वारणा (चांदोली) या तीन मुख्य प्रकल्पांबरोबर आठ मध्यम प्रकल्प, ५९ लघु प्रकल्पांमध्ये गेल्या २५ वर्षांमध्ये या महिन्यात सर्वांत कमी पाणीसाठा आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता (उत्तर) विजय पाटील यांनी ३० डिसेंबर २०१५ ला पंचगंगा व भोगावती नदीकाठच्या शेतीसाठी पाणी उपसाबंदीचे वेळापत्रक ग्रामपंचायत, पाणीसंस्था, विकास सेवा संस्था यांना माहितीसाठी पाठविले आहे.


वास्तविक या आदेशाने सहकारी पाणीपुरवठा संस्था अडचणीत येणार आहेत. २४ तासांतील आठ तासच वीज मिळत असून, २० दिवसांनी शेतकऱ्यांना पाणी मिळते. जर आठ दिवस उपसाबंदी केली, तर शेतकऱ्यांना महिन्यानेही पाण्याचा फेर येणार नाही. पर्यायाने उत्पादनात घट होणार आहे. अगोदरच ऊसदर आणि शेतीमालाला मिळणारा कमी दर यामुळे शेतकरी पिचला आहे. त्यात हे संकट योग्य नाही.
- सुभाष पाटील, अध्यक्ष,
केदारलिंग पाणीपुरवठा संस्था, वाकरे
शासनाने काढलेला आदेश म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार आहे. मुळात आताही आठ तासच वीज दिली जाते. त्यातही एक-दोन तास कपात असते. सोमवारी शेतीपंपांना वीज देतानाही हात आखडला जातो. या पूर्ण उपसाबंदीऐवजी चार तास कमी करून कालावधी द्यावा, अन्यथा पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करणार.
- राजेंद्र सूर्यवंशी, सदस्य,
पंचायत समिती, करवीर


उपसाबंदी वेळापत्रक
भाग १ - भोगावती नदी (राधानगरी धरण ते कोगे खडक उर्ध्व बाजू)
पाळक उपसाबंदी दिवस उपसा कालवधी दिवस
क्रमांक कालावधी
१०८-०१-२०१६८१६-०१-२०१६ ते ९
ते १५-०१-२०१६ २४-०१-२०१६
२२५-०१-२०१६ ते८२-२-२०१६ ते
१-०२-२०१६ १०-२-२०१६ ९
३११-०२-२०१६ ते १९-०२-२०१६ ते ९
१८-०२-२०१६ ८२७-०२-२०१६
भाग २ - पंचगंगा नदी (खडक कोगे अधो बाजू ते शिरोळ बंधारा)
१११-०१-२०१६८१९-०१-२०१६ ते ९
ते १८-०१-२०१६ २७-०१-२०१६
२२८-०१-२०१६ ते८०५-०२-२०१६ ते९
०४-०२-२०१६ १३-०२-२०१६
३१४-०२-२०१६ ते ८२२-०२-२०१६ ते९
२१-०२-२०१६ ०२-०३-२०१६


नियम डावलून उपसा केल्यास कडक कारवाई
उपसा कालावधीत अनधिकृतरीत्या उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. यासाठी पाटबंधारे अधिनियमन १९७६ कलम ५१८३ व ९७ मधील तरतुदीतील अधिकारानुसार हा आदेश काढण्यात आला आहे.
गेल्या २५ वर्षांत जिल्ह्यात प्रथमच पाटबंधारे विभागाने संपूर्ण उपसाबंदीचा आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पुढील वर्षी पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होणार आहे. हे टाळण्यासाठी ही उपसाबंदी करण्याचे धोरण असल्याचे संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Conjunction in Panchganga, Bhogavati river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.