केंद्रीय पुरातत्त्वकडूनच अंबाबाई मूर्तीचे संवर्धन
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 28, 2023 09:21 PM2023-02-28T21:21:18+5:302023-02-28T21:22:31+5:30
जिल्हाधिकारी रेखावार यांचे स्पष्टीकरण : अधिकाऱ्यांनी केली पाहणी
इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीचे केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून संवर्धन करून घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे पत्र विभागाला पाठवले असून विभागाच्या अधिकारी मूर्तीची पाहणी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिली. मूर्तीसंदर्भात कोणताही निर्णय लपवून छपवून घेतला जाणार नाही याची नागरिकांनी खात्री बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक विलास वहाने यांनी मूर्तीची पाहणी केली.
अंबाबाईच्या मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत असून त्यावर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रियादेखील टिकाव धरत नाही अशी स्थिती आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सवाआधी मूर्तीवर तातडीने संवर्धन करण्यात आले. त्याचाही फारसा परिणाम झालेला नाही. आता पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाल्याने जिल्हाधिकारी रेखावार यांनी तातडीने राज्य पुरातत्त्व खात्यातील सहसंचालक विलास वहाने यांना मूर्तीची पाहणी करण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी वहाने यांनी मूर्तीची पाहणी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"