पश्चिम घाटाचे संवर्धन मानवी जबाबदारी
By Admin | Published: January 6, 2015 09:37 PM2015-01-06T21:37:35+5:302015-01-06T21:52:49+5:30
मधुकर बाचूळकर : संत ज्ञानेश्वर व्याख्यानमाला
उत्तूर : निसर्गावर मानवाने अत्याचार केल्यास निसर्गच कोपतो. म्हणून निसर्गाला त्याच्याप्रमाणे वाढू दिले पाहिजे. जैवविधतेने नटलेल्या वनस्पतींचे संरक्षण, संवर्धन करणे ही जबाबदारी मानवाचीच आहे, असे प्रतिपादन डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले.
उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षण या विषयावर बोलत होते. संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे यांच्या हस्ते झाले.बाचूळकर म्हणाले, पश्चिम घाटातील प्राणी, भूप्रदेश, वनस्पती, खजिने महत्त्वाची आहेत. घाटातील अनेक प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास होणे गरजेचे आहे. वनस्पती तयार होण्यासाठी जितकी वर्षे वेळ लागतो; पण ती नष्ट करावयास जादा वेळ लागत नाही.जागतिक तापमानाचा वेग झपाट्याने वाढत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होऊन अनेक देश कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जंगलतोड, हवेचे वाढते प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. वाढत्या जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत दाखल होत आहे. आता ते आपल्या दारात आले आहे. मानवाचा विकास पर्यावरणावर अवलंबून आहे; पण तो कसा असावा हे आपण सर्वांनी ठरविले पाहिजे. चंदगड, आजरा, सिंधुदुर्ग या भागांत हत्तींचा प्रादुर्भाव, त्याला मिळणाऱ्या पोषक खाद्यामुळे वाढला आहे. याच्याकडे सकारात्मक हत्तींसाठी तो भाग आरक्षित करा, अशी मागणीही पर्यावरतज्ज्ञांनी केली असल्याचे बाचूळकर म्हणाले.पश्चिम घाटात मासे, भूचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, खनिजे, असल्याने ते टिकविणे हे एक आवाहन केले, ते जोपासणे गरजेचे आहे.
टी. के. पाटील यांनी स्वागत केले. अतिथी परिचय सदानंद पुंडपळ यांनी केले. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)