श्री जोतिबाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले, आजपासून पुन्हा नियमित दर्शनाला सुरुवात

By सचिन यादव | Published: July 7, 2024 12:46 AM2024-07-07T00:46:26+5:302024-07-07T00:47:44+5:30

ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली.

Conservation work of Sri Jotiba's idol postponed, regular darshan resumed from today | श्री जोतिबाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले, आजपासून पुन्हा नियमित दर्शनाला सुरुवात

श्री जोतिबाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले, आजपासून पुन्हा नियमित दर्शनाला सुरुवात


कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम पुढे ढकलल्याने जोतिबा देवांचे दर्शन आजपासून नियमितपणे सुरु राहणार आहे. ही माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली.

पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयातर्फे ७ ते ११ जुलै या कालावधीत देवाच्या मूर्ती संवर्धनाचे काम केले जाणार होते. मात्र या संदर्भात जोतिबा डोंगरावरील सर्व श्रीपूजकांची बैठक झाली. त्यामध्ये देवाची श्रावण षष्ठी यात्रा १० ऑगस्ट रोजी होत आहे. या यात्रेसाठी श्रीपूजकांना काही दिवस अगोदर तयारी करावी लागते. त्याचा विचार करुन मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली होती. त्यांच्या विनंतीचा विचार करुन संवर्धनाचे काम पुढे ढकलले आहे. त्यामुळे जोतिबांचे दर्शन नियमितपणे सुरु राहणार आहे.

Web Title: Conservation work of Sri Jotiba's idol postponed, regular darshan resumed from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.