नामशेष होणा-या जंगली आल्याचे संवर्धन करणार :अभिजित कासारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:04 AM2020-02-16T01:04:31+5:302020-02-16T01:05:11+5:30

जंगली आले ही एक औषधी वनस्पती आहे. जखमेवरील सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. जंगलात वाढणाऱ्या या वनस्पतीबद्दल स्थानिक जाणकार लोकांना याची माहिती आहे, पण अलीकडे व्यापारी प्रवृत्तीमुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे याचे संवर्धन करणे यालाच एक संशोधक म्हणून माझे प्राधान्य राहणार आहे.

 To conserve extinct wildlife | नामशेष होणा-या जंगली आल्याचे संवर्धन करणार :अभिजित कासारकर

नामशेष होणा-या जंगली आल्याचे संवर्धन करणार :अभिजित कासारकर

Next
ठळक मुद्देराज्यभर भटकंतीआल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.

नसिम सनदी ।

दुर्मीळ वनौषधी म्हणून वापरल्या जाणाºया जंगली आल्याच्या दोन नवीन जाती शोधून काढण्यात कोल्हापुरातील डॉ. अभिजित कासारकर यांना यश आले आहे. कासारकर हे मूळचे नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. ते सध्या विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रभर भटकंती करून कोकण आणि गडचिरोली येथे त्यांना या दोन आलेवर्गीय वनस्पतींचा शोध लागला. या शोधाची दखल तमिळनाडूच्या व्ही. बी. गौड संस्थेने घेत कासारकर यांना यावर्षीच्या युवा संशोधक पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यांच्या या वाटचालीबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न : जंगली वनस्पतींच्या संशोधनाकडे कसे वळला.
उत्तर : मी २०१३ मध्ये पीएच.डी.साठी जंगली वनस्पतींचाच विषय घेतला होता. यावर अभ्यास करताना याची गोडी लागत गेली. यातून जंगली आल्याचा संदर्भ सापडला. हे औषधी असल्याचे वाचनात आल्यानंतर तर त्याचा कसोशीने शोध सुरू केला. कोकण आणि गडचिरोलीमध्ये हा शोध संपला. तेथे या आलेवर्गीय दोन वनस्पती आढळून आल्या. त्याचे झिंगीबेर मोन्टॅनम आणि झिंगीबेर कॅपिटॅनम असे शास्त्रीय नाव आहे.

प्रश्न : अशा प्रकारच्या वनस्पती आणखी कुठे आढळतात.
उत्तर : अतिपाऊस आणि विशिष्ट प्रकारच्या मातीतच या कंदाचा विकास होत असल्याने केरळ, तमिळनाडूतील जंगलातच याचे प्रमाण जास्त दिसते. महाराष्ट्रात त्याचे दर्शन फारच दुर्मीळ होते. संशोधनाच्या निमित्ताने फिरल्यानंतरच या दोन वनस्पती महाराष्ट्रातही असल्याचे स्पष्ट झाल्याने खूपच आनंद झाला.

पेटंट मिळवणार
औषधनिर्मिती करणा-या कंपन्यांकडून याला मोठी मागणी आहे. भविष्यात यात अधिक संशोधन करण्याचा आपला मानस आहे. दोन वनस्पतींचा शोध हे आपले यश असून, त्यावरील पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. जंगली आल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.

या आल्याचे औषध गुणधर्म
एखादी जखम झाली, मुकामार लागला तर येणारी सूज कमी करण्यासाठी या आल्याचा रस अथवा चूर्ण लेप म्हणून लावला जातो असे जंगलात फिरताना स्थानिक लोकांकडून ऐकले होते. ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले असते, ते खरे असल्याचे सिद्ध झाले.

Web Title:  To conserve extinct wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.