कोल्हापूरकरांना दिलासा; सांगलीत अजूनही धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:14 AM2019-08-10T03:14:15+5:302019-08-10T06:19:43+5:30

पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ; अलमट्टीतून विसर्ग वाढला, शिरोळमध्ये परिस्थिती गंभीरच

Consolation to Kolhapurkar; Still afraid of Sangli | कोल्हापूरकरांना दिलासा; सांगलीत अजूनही धास्ती

कोल्हापूरकरांना दिलासा; सांगलीत अजूनही धास्ती

Next

कोल्हापूर : अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.

शिरोेळमध्ये सुमारे १२० लष्कराच्या जवानांनी चार बोटीच्या साहयाने मोहीम राबवली. पावसामुळे स्थलांतरासाठी अडचणी आहेत. पूरबाधित गावात लोकांच्या खाण्यापिण्यासाठी बोटीतून साहित्य प्रशासन यंत्रणा पाठवत आहे.सुमारे ७७ छावण्यामध्ये पूरग्रस्त दाखल झाले आहेत, शासनाची मदत नसतानाही सेवाभावी संस्थामार्फत पूरग्रस्त्तांना जेवण, चहा, नाष्टा दिला जात आहे. पुराच्या पाण्याने वेढलेल्या अनेक गावातील पूरग्रस्तांनी सुमारे तीनशे हून अधिक जनावरांचे दावे तोडून दिले.

दरम्यान शुक्रवारी मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते यांनी पूरस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली. शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या मदतीच्या बैठकीत ६० स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना उपस्थिती दर्शवत लागेल ती मदत देण्याची ग्वाही दिली.

४०० कोटींचे नुकसान
गेल्या पाच दिवसांत पुराच्या पाण्यामुळे असंख्य दुकाने , रुग्णालये, घरे, नागरिकांच्या पार्किंग केलेल्या चारचाकी, दुचाकी ,आदींचे बेसुमार नुकसान झाले आहे. यात विविध विमा कंपन्यांच्याकरीता सर्व्हेअरचे काम करणाऱ्या जाणकारांकडून सुमारे ४०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कºहाड, पाटणमधील पूर ओसरत असून जिल्ह्यातील ७ हजार ७५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले असून, त्यांची तात्पुरत्या निवाºयाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

Web Title: Consolation to Kolhapurkar; Still afraid of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.