चंद्रेच्या सरपंच तेजस्विनी देसाई यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:20 AM2021-01-09T04:20:08+5:302021-01-09T04:20:08+5:30

कसबा वाळवे : चंद्रे (ता. राधानगरी) या ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर गुरुवार, दि. ७ ...

Consolation to Tejaswini Desai, Sarpanch of Chandra | चंद्रेच्या सरपंच तेजस्विनी देसाई यांना दिलासा

चंद्रेच्या सरपंच तेजस्विनी देसाई यांना दिलासा

Next

कसबा वाळवे : चंद्रे (ता. राधानगरी) या ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर गुरुवार, दि. ७ रोजी विशेष गावसभेद्वारे गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी डाॅ. तेजस्विनी देसाई यांच्या कारभारावर मतदारांनी विश्वास दाखवत त्यांच्या बाजूने कौल दिला. ७०६ मतांनी अविश्वास ठराव फेटाळल्याने त्यांचे सरपंचपद कायम राहिले.

राधानगरी तालुक्यातील चंद्रे ग्रामपंचायतीच्या २०१७ ला झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय भैरवनाथ ग्रामविकास आघाडी यांच्याविरोधात शिवराम भैरू पाटील गटाच्या भैरवनाथ स्वाभिमानी शेतकरी युवा ग्रामविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. यात भैरवनाथ विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या होत्या. श्री भैरवनाथ स्वाभिमानी शेतकरी युवा ग्रामविकास आघाडीला लोकनियुक्त सरपंचपदासह दोन जागा मिळाल्या होत्या. अडीच वर्षानंतर सरपंच विरोधी गटाने सरपंच तेजस्विनी देसाई य‍ांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभेत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता.

शासन निर्णयानुसार अविश्वास ठराव ग्रामसभेतसुद्धा पारित होणे महत्त्वाचे असल्याने गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्या अधिकाराखाली ग्रामसभेमध्ये अविश्वास ठरावावर मतदान झाले. सुरुवातीस सकाळी ८ ते ११ या वेळेत मतदारांनी मतदानासाठी नावे नोंदवली. त्यामध्ये २५२९ पैकी २०४५ मतदारांनी नावे नोंदवली. २५२९ पैकी २०२६ इतक्या ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

त्यानंतर ६ बूथवर मतमोजणी होत गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी निकाल जाहीर केला. २०२६ मतदानांपैकी ५८ मते अवैध ठरली, तर अविश्वास ठरावाच्या बाजूने ६३१, तर अविश्वास ठरावाविरोधात १३३७ मते मिळाली. त्यामुळे सरपंचांविरोधातला अविश्वास ठराव ७०६ मतांनी नामंजूर झाल्याने पुन्हा एकदा सरपंच तेजस्विनी देसाई यांना सरपंचपदी काम करण्यास दिलासा मिळाला.

यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र जंगम, रतन साबळे, जमदाडे, उमेश चव्हाण, मंडल अधिकारी विशाल भोसले, आर. जी. ढालाईत, सुमीत शिंदे, चंद्रेचे ग्रामसेवक बी. डी. पाटील , बी. एम. कांबळे , बी. व्ही. तावडे, राधानगरी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, महसूलचे तलाठी, सर्कल आदींचा मतदान प्रक्रियेत सहभाग होता. राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात केला होता.

. . . . . . .चौकट . . . . . . .

चंद्रे ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर प्रभाग क्रमांक ४ मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक झाली, तर तत्कालीन उपसरपंच शीतल पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रभाग क्रमांक १ मध्ये रिक्त जागेसाठी निवडणूक झाली. त्यानंतर आता सरपंचांवरील अविश्वास ठरावावर निवडणूक झाली. त्यामुळे एका पंचवार्षिक कालावधित चंद्रे ग्रामपंचायतीसाठी चार निवडणुका झाल्याने ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याची मतदारांमधून चर्चा होत होती.

Web Title: Consolation to Tejaswini Desai, Sarpanch of Chandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.