हे तर मनोरा हॉटेलच्या बदनामीचेच षड्‌यंत्र;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:42 AM2021-03-04T04:42:44+5:302021-03-04T04:42:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करण्याचा प्रकार म्हणजे हाॅटेलच्या बदनामीचे षड्‌यंत्र आहे. या ...

This is a conspiracy to discredit the Manora Hotel; | हे तर मनोरा हॉटेलच्या बदनामीचेच षड्‌यंत्र;

हे तर मनोरा हॉटेलच्या बदनामीचेच षड्‌यंत्र;

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करण्याचा प्रकार म्हणजे हाॅटेलच्या बदनामीचे षड्‌यंत्र आहे. या घटनेचे चित्रीकरण पाहिल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आल्याचे मनोरा हाॅटेलचे मालक निवास बाचूळकर यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. या घटनेचा कोल्हापूर हॉटेल मालक संघानेही निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.

पाल भाजीमध्ये शिजली असेल तर त्यातून मग विषबाधा व्हायला हवी होती. तसे झालेले नाही. पाल थेट प्लेटमध्येच कोठून आली? यातच खरे काळेबेरे असल्याचे सांगून बाचूळकर म्हणाले, शनिवारी (दि. २७) रात्री दहा-बारा तरुण हाॅटेलमध्ये आले होते. कडेला बसलेल्या तरुणाने जेवण सुरू असतानाच मित्राची डिश आपल्यासमोर घेऊन मागील खिशातून पाल काढून त्या भाजीमध्ये टाकल्याचे दिसते. तो तरुण ही भाजी चमच्याने मिक्स करतो व डिश मित्राज‌वळ देतो. मित्र त्यातील भाजी वाढून घेऊन पाल शोधतो, पण त्याला ती सापडत नाही. शेजारचा मित्र पाल शोधून काढतो आणि समोरच्या मोकळ्या डिशमध्ये ठेवून मित्राला व्हिडीओ बनवायला सांगतो, हे सगळे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. त्यानंतर मोबाईलवर त्यांनी जेवणामध्ये पाल सापडल्याचे चित्रीकरण केले. त्यासोबतच कर्मचाऱ्यांसोबतच हुज्जत घातली. या तरुणांनी हाॅटेलचे नाव वापरून तातडीने त्याची क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल केली. हा प्रकार म्हणजे हाॅटेलची बदनामी करण्याचे षड्‌यंत्रच आहे. त्यामुळे संबंधित तरुणांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

Web Title: This is a conspiracy to discredit the Manora Hotel;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.