परवान्याअभावी ३९ लाख चौरस फूट भूखंडावरील बांधकामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:13+5:302021-03-13T04:42:13+5:30

साधारणत: ३५० परवाने प्रलंबित असल्याने बांधकाम प्रकल्पांची सुरुवात थांबली आहे. मार्चमध्येच हे परवाने मिळणे आवश्यक आहे. अन्यथा बांधकाम व्यावसायिकांसमोरील ...

Construction on 39 lakh square feet of land pending due to lack of license | परवान्याअभावी ३९ लाख चौरस फूट भूखंडावरील बांधकामे प्रलंबित

परवान्याअभावी ३९ लाख चौरस फूट भूखंडावरील बांधकामे प्रलंबित

Next

साधारणत: ३५० परवाने प्रलंबित असल्याने बांधकाम प्रकल्पांची सुरुवात थांबली आहे. मार्चमध्येच हे परवाने मिळणे आवश्यक आहे. अन्यथा बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढणार आहेत. नगररचना विभागात चौकशी केली असता निवडणुकीचे काम असल्याचे सांगितले जात आहे. परवाने लवकर मिळावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांना आम्ही भेटणार आहोत.

- विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई, कोल्हापूर.

विविध सवलती, युनिफाईड नियमावलीतील सुधारणांमुळे बांधकाम क्षेत्राने मरगळ झटकली आहे. या क्षेत्राला नगररचना विभागाने परवाने वेळेत देऊन मदत करावी. महापालिका प्रशासकांनी या विभागाला पुरेसे कर्मचारी द्यावेत. त्यांच्यावर निवडणुकीची काही कामे सोपवू नयेत, तरच प्रलंबित परवाने लवकर मिळून बांधकाम व्यावसायिकांची अडचण दूर होईल.

- सचिन ओसवाल, बांधकाम व्यावसायिक.

चौकट

दर कमी करण्यासाठी पाठपुरावा

सिमेंटच्या पोत्याचे दर ३५० रुपये, तर स्टील ५८ हजार रुपये प्रति टन आहे. हे दर कमी करण्यासाठी क्रिडाई नॅशनलच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे विद्यानंद बेडेकर यांनी सांगितले.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

सध्या शहरात सुरू असलेले बांधकाम प्रकल्प : ६०

तयार असलेल्या घरांची संख्या : सुमारे ५००

परवाने मिळाल्यानंतर बांधकाम सुरू होणारे प्रकल्प : १२५

या प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात उपलब्ध होणारी घरे : १५००

Web Title: Construction on 39 lakh square feet of land pending due to lack of license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.