आंबा घाटात पर्यायी रस्त्यांचे बांधकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:48+5:302021-07-31T04:25:48+5:30
कालपर्यंत घाटात चौदा ठिकाणी कोसळलेली दरड रस्त्यापासून बाजूला करण्यात आली. येत्या चार दिवसांत पर्यायी रस्त्यांची उभारणी होईल, असे सार्वजनिक ...
कालपर्यंत घाटात चौदा ठिकाणी कोसळलेली दरड रस्त्यापासून बाजूला करण्यात आली. येत्या चार दिवसांत पर्यायी रस्त्यांची उभारणी होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कौशिक रहाटे यांनी लोकमतशी स्पष्ट केले.
मंगळवारपासून छोट्या वाहण्याची एकेरी वाहतूक सुरू होईल. त्यासाठी मुर्शी, आंबा चेकपोस्टवर साईट स्टापर म्हणजे लोखंडी कमान बसवून छोट्या वाहनांना प्रवेश तर अवजड वाहनांना बंदी असेल. एसटी सुरू करता येणार नाही. घाटात पावसाचा जोर व सततचे धुके असल्याने अवजड वाहने या ठिकाणी फसू शकतात. त्यातून रस्ता आणखी खचण्याचा धोका आहे. पाऊस संपेपर्यंत दरीच्या बाजूने खचलेल्या रस्त्यावर बांधकाम करणे शक्य नसल्याने अवजड वाहनांना वाहतुकीस परवानगी देणे शक्य नसल्याचे रहाटे यांनी स्पष्ट केले.
पावसामुळे दरड पडण्याची टांगती तलवार असल्याने दोन्ही सीमेवर पोलीस बंदोबस्त कायम आहे.
३० आंबा घाट रस्ता
फोटो ओळी- आंबा घाटात खचलेल्या रस्त्यांच्या डोंगराकडील बाजूने रस्ता रुंद केला जात आहे.