बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 09:20 PM2018-06-22T21:20:04+5:302018-06-22T21:24:41+5:30

कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत.

Construction department 'is not a problem, but a detention!': Picture of Kurundwad Municipal | बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

बांधकाम विभाग ‘असून अडचण नसून खोळंबा!’ : कुरुंदवाड पालिकेतील चित्र

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम सभापतींना स्वतंत्र कक्षच नाही

गणपती कोळी।
कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यांना स्वतंत्र कक्ष मिळालेले नाहीत. सहा महिन्यांपासून बांधकाम विभागाकडील कनिष्ठ अभियंतापद प्रभारी राहिले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदाला पालिकेने महत्त्वच कमी केले असून, बांधकाम विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच कुरुंदवाडची अवस्था आहे.

पालिका क्षेत्रात बांधकाम विभागाला विशेष महत्त्व असते. या समितीचे केवळ सभापतिपदच नव्हे, तर समिती सदस्य होण्यासाठीही नगरसेवक प्रतिष्ठा पणाला लावतात. शहराची विकासाची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या या विभागात टक्केवारीत व्यवहार चालत असल्याने बांधकाम विभाग मिळण्यासाठी मोठे राजकारण चालते.
अशा महत्त्वाच्या खात्याचे येथील पालिकेमध्ये मात्र खच्चीकरणच केले जात असल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या स्थापनेपासून या विभागाच्या सभापतीला स्वतंत्र कक्ष आहेत. शहराच्या बांधकाम विभागासाठी कनिष्ठ अभियंतापद असून, एक स्वतंत्र अधिकारी आहे.

जानेवारीमध्ये समित्या निवडी झाल्या. बांधकाम विभागावरच शहराच्या विकासाचे चित्र ठरू शकते. यामुळे नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अभ्यासू तसेच नवीन विकासाचा दृष्टिकोन व तळमळ असणारे प्रा. सुनील चव्हाण यांना सभापतिपद दिले. त्यांच्यावर जबाबदारी दिल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, पालिका स्थापनेपासून या विभागाला स्वतंत्र कक्ष असताना प्रा. चव्हाण यांना स्वतंत्र कक्ष अद्याप मिळालेला नाही.

या विभागाचे कनिष्ठ अभियंता पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असून, प्रभारी अधिकाºयांवर कारभार चालविला जातो. आठवड्यातून दोन दिवस येणाºया या अधिकाºयांमुळे शहराच्या विकासालाच ‘खो’ बसला आहे. त्यामुळे या विभागाचे महत्त्वच कमी झाले आहे. या पदावर कार्यक्षम सभापती असताना अधिकार आणि अधिकाºयाविना खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा असून, या प्रकाराने पालिकेच्या बांधकाम विभागाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच स्थिती झाली आहे.

पूर्णवेळ बांधकाम अभियंत्याची गरज
शहराच्या विकासाची अर्थवाहिनी असणाºया बांधकाम विभागाचा दररोज आढावा घेणे, बैठका घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष हवा. तसेच पूर्णवेळ बांधकाम अभियंता असणे गरजेचे आहे. तरच शहराच्या विकासाला गती मिळू शकते.

२५ वर्षे बांधकाम सभापतिपद
शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. गणपतराव पोमाजे सलग पंचवीस वर्षे बांधकाम सभापतिपद आपल्याकडे होते. स्वतंत्र कक्षाबरोबर या विभागावर त्यांचा दबदबा होता.
त्यामुळे पालिकेचा कोणताही निर्णय यांच्या मान्यतेशिवाय पुढे सरकत नसे. त्यामुळे पालिकेत लोकप्रतिनिधींचे महत्त्व त्यांनी वाढविले होते.

Web Title: Construction department 'is not a problem, but a detention!': Picture of Kurundwad Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.