‘जमिअत उलमा ए’तर्फे महापुरात पडझड झालेल्या घरांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:22 AM2021-03-21T04:22:24+5:302021-03-21T04:22:24+5:30

कोल्हापूर : जमिअत उलमा ए यांच्या वतीने जुलै, ऑगस्ट २०१९ च्या महापुरात पडझड झालेल्या ६६ घरांची उभारणी केल्याची माहिती ...

Construction of flood-ravaged houses by Jamiat Ulama A. | ‘जमिअत उलमा ए’तर्फे महापुरात पडझड झालेल्या घरांची उभारणी

‘जमिअत उलमा ए’तर्फे महापुरात पडझड झालेल्या घरांची उभारणी

Next

कोल्हापूर : जमिअत उलमा ए यांच्या वतीने जुलै, ऑगस्ट २०१९ च्या महापुरात पडझड झालेल्या ६६ घरांची उभारणी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मुफ्ती इम्रान कास्मी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

जमिअत उलमा ए ही एक सामाजिक संघटना असून, देशभरात कोठेही आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर तिथे मदतीसाठी सर्वांत पुढे असते. शंभर वर्षापूर्वीच्या या संस्थेच्या वतीने जातपात न मानता सर्वधर्मीय गोरगरीब लोकांना मदत केली जाते. महापुरात कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी गरीब कुटुंबांना कपडे, धान्य वाटप केले. तब्बल २२ दिवस अनेकांना दोन वेळचे जेवण दिले. शासकीय मदतीपासून वंचित असणाऱ्या लाेकांना मदत करायची, यासाठी १५३ नावे राज्य कार्यालयाकडे पाठविली होती. त्यांच्या समितीने जागेवर येऊन लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. घरबांधणीसाठी सव्वा ते दीड लाख, तर दुरुस्तीसाठी वीस ते ऐंशी हजार रुपये अशी ७३ लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस अस्लम सय्यद व शहराध्यक्ष अझहर सय्यद यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील ५४, इचलकरंजी ७ व कोल्हापूर शहरातील ५ लोकांना मदत केली. या घरांचा लोकार्पण सोहळा लवकरच होत असल्याचे मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी सांगितले. यावेळी बशीर नाईकवडे, रफिक शेख, इम्तियाज पटेल, जावेद शेख, माजीद पटेल, इरफाब चॉंद, अरिफ देसाई, आदी उपस्थित होते.

Web Title: Construction of flood-ravaged houses by Jamiat Ulama A.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.