कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एस.टी बसच्या स्क्रॅप पासून सॅनिटायझर टनेलची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 07:37 PM2020-04-14T19:37:02+5:302020-04-14T19:37:32+5:30
कोल्हापूर विभागातील कार्यशाळेत विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण तयार करण्यात आले आहे.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने एस.टी बसच्या स्क्रॅप पासून सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. अल्पदरामध्ये तयार झालेले हे उपकरण मध्यवर्ती बसस्थानकांत लावण्यात आले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणाची निर्मिती एस.टीच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने केली आहे. बसस्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीच्या ठिकाणी टनेल सॅनिटायझरची उभारणी करून निजंर्तुर्कीकरण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर विभागातील कार्यशाळेत विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण तयार करण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीमध्ये सॅनिटायझरच्या मिश्रणाचा वापर केले जाणार आहे. लहान मोटरद्वारे उभारण्यात आलेल्या १२ फुट उंचीच्या दहा फूट लांब केबीनमध्ये टनेलद्वारे फवारणी केली जाते. नोजलद्वारे हलकी पाण्याची फवारणी केली जाते. यामधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला ४ ते ५ सेकंदाची वेळ लागते. त्याद्वारे प्रवाशी व कर्मचारी यांचे निजंर्तुकीकरण केले जाते. यासाठी सर्व यंत्रकर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.
सरकार चांगल्या पध्दतीने कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देत आहे. या लढाईमध्ये प्रत्येकांनी आपल्या पद्धतीने सहभाग घेतला पाहिजे. स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीनेआम्ही हे उपकरण तयार केले आहे. - रोहन पलंगे, विभाग नियंत्रक कोल्हापूर
सहा हजार खर्च
कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार केलेले सॅनिटायझर टनेल हे एस.टी स्क्राप मटेरिलय पासून केले आहे.फक्त सहा हजार रुपये यासाठी खर्च आला आहे.