बांधकाम कामगारप्रश्नी पुन्हा तीन दिवसांनी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:04 PM2019-09-19T16:04:26+5:302019-09-19T16:06:11+5:30
बांधकाम कामगारांचे जास्तीत जास्त अर्ज येत्या तीन दिवसांत निकाली काढू, त्यानंतरच बैठक घेऊ, अशी औपचारिक चर्चा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि सहसचिव शिवाजी मगदूम यांच्याशी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केली.
कोल्हापूर : बांधकाम कामगारांचे जास्तीत जास्त अर्ज येत्या तीन दिवसांत निकाली काढू, त्यानंतरच बैठक घेऊ, अशी औपचारिक चर्चा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि सहसचिव शिवाजी मगदूम यांच्याशी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केली.
बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला, कामगारांचे नोंदणी झालेले अर्ज निकाली काढा, बंद केलेला मेडिक्लेम पुन्हा सुरू करा, घरबांधणीसाठी सुमारे साडेपाच लाख रुपये अनुदान द्या, आदी मागण्यांसाठी सोमवारी (दि. १६) लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता.
त्यावेळी सहायक कामगार आयुक्त अलिन गुरव हे कामानिमित्त बाहेर गेल्याने विविध मागण्यांसाठी संघटनेचे नेत्यांसोबत बुधवारी बैठक घेण्याचे मान्य केले होते; पण संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी औपचारिक चर्चा झाली.
सहायक आयुक्त गुरव यांनी, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अचानक लागण्याची शक्यता असल्याने चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा येत्या तीन दिवसांत जास्तीत जास्त अर्ज निकाली काढू व त्यानंतरच चर्चा करू, असे सुचविले. त्यानुसार पुढील तीन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले.
- बांधकाम अवजारे खरेदीसाठीचे सुमारे ६८७७ बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंब्बित आहेत.
- पैकी १५४७ अर्ज निकाली काढले.
- विविध लाभांपासून वंचित असे २००० बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत.
- पैकी १६७ अर्ज निकाली काढले.