बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये साहाय्यता निधी मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:56+5:302021-06-06T04:18:56+5:30
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या बांधकाम कामगारांसाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. गेल्यावर्षी कोरोना साहाय्यता निधी ...
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या बांधकाम कामगारांसाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. गेल्यावर्षी कोरोना साहाय्यता निधी म्हणून शासनाने या कामगारांना ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. दोन टप्प्यांतील हे अनुदान अद्याप लाखो कामगारांना मिळाले नाही. यावर्षी पुन्हा पंधराशे रुपये साहाय्यता निधी जाहीर केला आहे. मात्र हा साहाय्यता निधी तुटपुंजा असल्याने गेल्यावर्षीप्रमाणे ५ हजार रुपये साहाय्यता निधी मिळावा, कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरणाचे हजारो अर्ज प्रलंबित आहेत. हे अर्ज ताबडतोब निकाली काढावेत. बहुतांश बांधकाम कामगार अशिक्षित असल्याने रजिस्टर्ड ट्रेड युनियनमार्फत सभासद असणा-या बांधकाम कामगारांच्या यादीप्रमाणे नोंदणी व नूतनीकरणाची फी भरून घेऊन कामगारांना साहाय्यता निधीचा लाभ द्यावा, नोंदणीसाठी ऑनलाइन पद्धतीबरोबरच ऑफलाइन पद्धतही सुरू करावी आदी मागण्यांसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात दत्ता माने, भरमा कांबळे, शामराव कुलकर्णी, मदन मुरगुडे, राजेंद्र निकम यांचा समावेश होता.