बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:43+5:302021-09-27T04:25:43+5:30
म्हाकवे : बांधकाम कामगारांना दिवाळीला १० हजार बोनस, आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शेतकरी व कामगार ...
म्हाकवे : बांधकाम कामगारांना दिवाळीला १० हजार बोनस, आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा. यासाठी २७ रोजी होणाऱ्या देशव्यापी भारत बंद आंदोलनात कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करुया असा निर्धार सीटूचे जिल्हा सचिव काँ. शिवाजी मगदूम यांनी केला. दरम्यान, कामगारांना दिवाळी बोनस मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असाही निर्धार यावेळी करण्यात आला.
आणूर (ता.कागल) येथे कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष विक्रम खतकर होते. प्रास्ताविक बाळासाहेब कापडे यांनी केले. यावेळी प्रकाश रामाणे, प्रवीण जाधव, काँ. मोहन गिरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जोतीराम मोगणे(हमिदवाडा), दगडू कांबळे(वंदूर), दिनकर जाधव(करड्याळ), गणपती सुतार (सुरूपली), शिवाजी पाटील(सिध्दनेर्ली), मच्छिंद्र कदम (खडकेवाडा), सुनील नुल्ले (चिखली), यलापा पाटील(चौंडाळ), युवराज शिंदे( बानगे), शिवाजी सुतार(अर्जुनवाडा), प्रकाश कांबळे(म्हाकवे), काँ.राजू आरडे यांनी आभार मानले.