..तर बांधकाम कामगारांची उपासमार होईल : कामगार संघटनेची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:35 PM2020-03-26T21:35:34+5:302020-03-26T21:38:14+5:30
गत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
कोल्हापूर --कोरोनाच्या पाश्वभुमीवर राज्यातील गावेच्या गावे लॉकडाऊन झाली आहेत.त्यामुळे बांधकाम कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. हात थांबल्याने त्यांच्या कुंटुबाच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्यावर उपासमारीची टांगती तलवार आहे. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी सिटू संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष काँ.भरमा कांबळे व संघटनेचे राज्यसचिव काँ.शिवाजी मगदूम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील हे निवेदन यांनाही देण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन देण्याचे आदेश दिल्यामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न कांही अंशी मिटला आहे. परंतु बांधकाम कामगारांची अर्थिक अवस्था फार गंभीर बनली आहे.त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा